वाराणसी (उत्तर प्रदेश) : नक्कीघाट परिसरात भाजप (BJP) नेत्याच्या कुटुंबाला धमकावण्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. घरात घाणेरडं पाणी शिरू नये, म्हणून माती टाकल्याने इन्स्पेक्टर सुरेश सिंह यादव यांचा मुलगा प्रकाश यादव संतापला आणि त्यानं भाजपचे फतेहपूर सेक्टर बूथ अध्यक्ष कमलकांत गुप्ता यांच्यावर रायफल रोखून जीवे मारण्याची धमकी दिली.