

Police Suspect Sex Racket Operating Under Guise of Guest House Services
esakal
उत्तर प्रदेशातील वाराणसीमध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या संशयावरून पोलिसांनी एका गेस्ट हाऊसवर छापा टाकत चार महिला आणि तीन पुरुषांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान गेस्ट हाऊसच्या चार वेगवेगळ्या खोल्यांमध्ये संबंधित व्यक्ती आक्षेपार्ह स्थितीत आढळून आल्याची माहिती पोलिसांनी दिली. खोल्यांची झडती घेतल्यानंतर पोलिसांना काही अश्लील साहित्यही सापडले आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी चर्चा रंगली आहे.