पंतप्रधानांच्या मतदारसंघातील वाराणसी अस्वच्छ शहर - अल्फोन्स

वृत्तसंस्था
बुधवार, 6 जून 2018

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदार संघातून निवडूण आले आहेत. परंतु, वारणसी अस्वच्छ शहर झाले असून, वाराणसीला स्वच्छ करण्याची गरज आहे. असे मत केंद्रीय मंत्री के. जे. अल्फोन्स यांनी व्यक्त केले. मंगळवारी वाराणसीमधील दश्वामेध घाटावरील डोळे दिपवणाऱ्या गंगा नदीच्या आरतीला अल्फोन्स उपस्थित होते.

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी उत्तर प्रदेशातील वाराणसी मतदार संघातून निवडूण आले आहेत. परंतु, वारणसी अस्वच्छ शहर झाले असून, वाराणसीला स्वच्छ करण्याची गरज आहे. असे मत केंद्रीय मंत्री के. जे. अल्फोन्स यांनी व्यक्त केले. मंगळवारी वाराणसीमधील दश्वामेध घाटावरील डोळे दिपवणाऱ्या गंगा नदीच्या आरतीला अल्फोन्स उपस्थित होते.
अल्फोन्स म्हणाले, "पर्यटक आकर्षित होतील एवढी क्षमता वाराणसीमध्ये आहे. परंतु, येथील अस्वच्छ वातावरणामूळे काही वर्षांपासून पर्यटकांमध्ये घट होत आहे. हिंदू धर्मातील पाण्यात दूध, फुले टाकण्याच्या विधीमुळे गंगा नदी प्रदुषीत होत आहे. त्याचबरोबर येथील अरुंद रस्ते शहाराच्या वाहतूककोंडीला हातभार लावतात. यामुळेही पर्यटक यायला नको म्हणतात." नरेंद्र मोदी यांच्या मदतारसंघातील अवस्था पाहून वाराणसीला जपानमधील सुंदरतेसाठी जगप्रसिद्ध असलेल्या क्योटो शहरासारखे बनवता येऊ शकले. असे केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री अल्फोन्स म्हणाले.
  
अल्फोन्स यांनी केलेल्या वक्तव्यावर समजावादी पक्षाचा प्रवक्त्या जुही सिंह यांनी प्रतिक्रिया दिली. सिंह म्हणाल्या, "आता भाजपचे मंत्रीच वाराणसीतले जमिनीवरील वास्तव पाहून टिका करू लागले आहेत. केंद्र किंवा योगी आदित्यनाथ सरकारने पंतप्रधानांच्या मतदारसंघात कोणतेही विकासकाम केलेले नाही. हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही माहिती आहे."

भाजपने अल्फोन्स यांची बाजू घेते, "नरेंद्र मोदी निवडूण आल्यानंतर वाराणसीमध्ये अनेक सुधारणा झाल्या आहेत. अल्फोन्स हे दक्षिणेतून आलेत. तेथील शहरे चांगली विकसीत झाली आहेत. वाराणसीमधील परिस्थिती सुद्धा सुधारलेली आहे. जनतेनेही हा बदल स्विकारला आहे." असे भाजप प्रवक्ते राकेश त्रीपाठी यांनी म्हटले आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने (डब्ल्यूएचओ) मागील महिन्यात 'स्वच्छ सर्वेक्षण' या मार्फत सर्वे करून माहिती जाहीर केली आहे. यामध्ये जगातील सर्वात जास्त प्रदूषीत असणाऱ्या पहिल्या 20 शहरांमध्ये भारतातील 14 शहरांचा समावेश आहेत. त्यामध्ये दिल्ली आणि वाराणसी यांचा क्रमांक वरचा आहे. देशातील स्वच्छ शहरांमध्ये वाराणसीचा क्रमांक 32 एवढा मागे आहे.

Web Title: varanasi most polluted city said - Alphons