वाराणसीत 5 कोटी रुपये किंमतीचा गांजा जप्त; दोघांना अटक

टीम ई सकाळ
Thursday, 14 January 2021

डीआरआय वाराणसीच्या टीमने वाराणसी प्रयागराज महामार्गावर राजा तलावाजवळ ट्रक अडवला. गांजासह दोघांना अटक करण्यात आली आहे. 

वाराणसी - वाराणसीत DRI च्या पथकाने मोठी कारवाई केली आहे. वाराणसीमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा गांजाचा साठा जप्त करण्यात आला. आरआयच्या पथकाला तपासणीवेळी जवळपास 38.5 क्विंटर गांजा आढलून आला.वाराणसीतील राजा तलावाजवळ एका ट्रकची तपासणी करताना पोलिसांना धक्काच बसला.

याबाबात मिळाली माहिती अशी की, गांजाची वाहतून जौनपूरमधील मुंगरा बादशाहपूरला केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती. त्या पार्श्वभूमीवर नाक्यावर तपासणी केली जात होती. डीआरआय वाराणसीच्या टीमने वाराणसी प्रयागराज महामार्गावर राजा तलावाजवळ ट्रक अडवला. गांजासह दोघांना अटक करण्यात आली आहे.

हे वाचा - NCERT च्या पुस्तकात 'आधारहीन' इतिहास? मुघलांशी निगडीत नाहीये माहिती

जप्त करण्यात आलेल्या गांजाची किंमत तब्बल 5 कोटी रुपयांहून अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. गांजा पशुआहारने भरलेल्या पोत्यांच्या खाली लपवून नेला जात होता. अटक करण्यात आलेल्या दोघांना न्यायालयात हजर करण्यात येईल. त्यानंतर त्यांना न्यायालयीन कोठडीत पाठवलं जाईल. 

ओडिसा आणि आंध्र प्रदेशातील नक्षली भागातून देशभरात गांजाचा पुरवठा केला जातो. गांजाच्या कमाईतून मिळणारा पैसा हा नक्षली कारवायांसाठी वापरण्यात येतो. यादिशेनं जोनपूरमध्ये राहणाऱ्या गांजा तस्करांचा शोध सुरू करण्यात आला आहे. लवकरच सर्वांना अटक करण्यात येईल अशी माहिती पोलिसांनी दिली. गांजाच्या या तस्करीमागे काही पांढरपेशा लोकांचाही हात असल्याचं सांगण्यात आलं आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: varanasi-police-seized-shipment-of-ganja worth 5 cr