

Who Is Vardhaman Jain?
Esakal
Tirumala Temple Gold Donation: आंध्र प्रदेशातील तिरुमला मंदिरात एका भक्ताने १२१ किलो सोन्याचे दागिने दान केलेत. या सोन्याची अंदाजे किंमत १५० ते १६० कोटी रुपयांच्या दरम्यान आहे. सोन्याचे दागिने दान करणाऱ्या उद्योगपतीचं नाव वर्धमान जैन असं आहे. वर्धमान जैन यांची श्रद्धा आहे की भगवान व्यंकटेश्वराच्या कृपेनंच व्यवसायत मोठं यश मिळालंय. त्यामुळे कृतज्ञतेच्या भावनेतून देवाला १६० कोटी रुपये किमतीचे १२१ किलो सोन्याचे दागिने अर्पण केले आहेत.