
पणजी : मराठी सिनेसृष्टीतील अभिनेत्री वर्षा उसगावकर यांचे वडिल अच्युत उसगावकर यांचे आज (ता. १६) मंगळवारी गोव्यात निधन झाले. त्यांचे वय ८८वर्षे इतके होते. गोवा मुक्तीनंतर अधिकारावर आलेल्या स्वर्गीय भाऊसाहेब बांदोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर हे मंत्री होते.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
उसगावकर हे मिरामार येथे राहत होते. वृद्धापकाळाने अलिकडे ते आजारी होते. त्यांची प्राणज्योत मालवल्याचे कळताच गोव्यातील विविध समाज घटकांतून दु:ख व्यक्त करण्यात येत आहे. गोव्याची पोर्तुगीज राजवटीतून १९६२ साली मुक्तता झाली व मग महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाच्या सत्तेचा काळ सुरू झाला. हा पक्ष सतरा वर्षे सत्तेत होता.
--------
रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी; प्रशासनाने घेतला 'हा' निर्णय
---------
दिल्लीनंतर जम्मू काश्मीरसह गुजरातही हादरलं; ६.८ तीव्रतेचा भूकंप
----------
उसगावकर हे महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे नेते होते. आमदार व मंत्री म्हणून सत्तरच्या दशकात उसगावकर यांनी भरपूर लोकोपयोगी कामे केली. प्रथम भाऊसाहेब बांदोडकर व मग भाऊंची कन्या स्वर्गीय शशिकला काकोडकर यांच्या मंत्रिमंडळात उसगावकर मंत्री होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.