वरूण धवन, अनुष्का शर्मा 'स्कील इंडिया'चे दूत

Varun Dhawan Anushka Sharma signed as ambassadors of Skill India Campaign
Varun Dhawan Anushka Sharma signed as ambassadors of Skill India Campaign

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरु केलेल्या 'स्कील इंडिया' या मोहिमेचे दूत म्हणून अभिनेता वरूण धवन आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा या दोघांची निवड करण्यात आली आहे. याबाबतची माहिती 'प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो'कडून (पीआयबी) देण्यात आली. 

'सुई-धागा : मेड इन इंडिया' या चित्रपटात अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांची प्रमुख भूमिका आहे. देशातील प्रगतीवर आधारित हा पहिलाच चित्रपट आहे. या चित्रपटात भारतातील कुशल आणि प्रभावशाली कारागीरांचे तसेच तळागाळातील कुशल कामगारांचे चित्र रेखाटण्यात आले आहे. याशिवाय या कारागीरांसमोरील प्रश्न आणि समस्या मांडण्यात आल्या आहेत. या समस्यांना हे कारागीर कशाप्रकारे सामोरे जातात, हे दाखविण्यात आले आहे. या चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर वरूण धवन आणि अनुष्का शर्मा हे दोघेही 'स्कील इंडिया'साठी काम करणार आहेत. या योजनेंतर्गत देशातील विविध भागातील कुशल कारागीर यांच्यासाठी वेळ देणार आहेत. 

याबाबत वरूण धवनने सांगितले, की ''भारत सरकारच्या 'स्कील इंडिया' या मोहिमेचा आम्ही भाग बनत असल्याने आम्हाला अत्यंत आनंद होत आहे. आमच्यासाठी ही एक अभिमानाची गोष्ट आहे''.  

अनुष्का शर्मा म्हणाली, की 'स्कील इंडिया' योजनेंतर्गत देशातील कुशल शक्तीचा समावेश आणि समर्थन करण्याबाबत सरकारचा दृढ संकल्प आहे. 'सुई-धागा' तयार करत असताना ज्या लोकांना त्यांची कला दाखविण्याची योग्य संधी मिळाली नाही, अशा प्रतिभाशाली, कुशल शिल्पकार आणि कारागीरांच्या समस्या, अडचणी मांडल्या आहेत.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com