वास्कोत तीन दुकाने फोडून 75 हजार रुपये लूटले

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

मुरगाव वास्को गोवा - येथील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोवा पर्यटन खात्याच्या वास्को रेसिडन्सी या इमारतीत असलेली तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली. यामध्ये 75 हजार रुपये लूटल्याचे उघडकीस आले.

मुरगाव वास्को गोवा - येथील शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गोवा पर्यटन खात्याच्या वास्को रेसिडन्सी या इमारतीत असलेली तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली. यामध्ये 75 हजार रुपये लूटल्याचे उघडकीस आले.

वास्को रेसिडन्सी इमारतीतील ब्युटीपार्लर, कुरीयर ऑफिस, आणि एक कन्सल्टन्सी आफिस अशी तीन दुकाने अज्ञात चोरट्यांनी फोडली. आज सकाळी इमारतीतील सुरक्षा रक्षकांनी मुख्य गेट उघडल्यावर तीन दुकाने फोडल्याचे आढळून आले. या प्रकरणी सुरक्षा रक्षकांने वास्को रेसिडेन्सीच्या व्यावस्थापकाला कल्पना दिल्यानंतर वास्को पोलिसांना पाचारण करण्यात आले. ठसे तज्ञही घटना स्थळी दखाल झाले आहेत. वास्को पोलिस या प्रकरणी तपास करीत आहेत.

Web Title: In Vasco, three shops were looted for 75 thousand rupees