Rahul Gandhi : टोमॅटो दरवाढीवरून रडला होता भाजी विक्रेता; आता थेट राहुल गांधींसोबत केलं जेवण

Rahul Gandhi
Rahul Gandhi
Updated on

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी व्हायरल झालेल्या भाजी विक्रेत्या रामेश्वर यांच्यासोबत जेवण केलं. रामेश्वर अलीकडेच एका सोशल मीडिया व्हिडिओमध्ये महागाईमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल बोलत असताना रडताना दिसले होते. राहुल गांधी यांनी जेवण केल्यानंतर रामेश्वरसोबतचा फोटोही सोशल मीडियावर शेअर केला.

रामेश्वरसोबतचा फोटो शेअर करत राहुल गांधींनी ट्विटरवर लिहिले, “रामेश्वर जी एक मनमिळाऊ व्यक्ती आहेत! त्यांच्यात कोट्यवधी भारतीयांच्या स्वभावाची झलक दिसते. प्रतिकूल परिस्थितीतही हसतमुखाने पुढे जाणारेच खरे 'भारत भाग्य विधाते'

काँग्रेसने सोशल मीडिया त्यांचा फोटो शेअर करत लिहिले की, “रामेश्वरजींनी लोकांच्या नायकाला भेटण्याची इच्छा व्यक्त केली होती. ते भेटले." ट्विटरवर अनेक लोकांनी शेअर केलेल्या फोटोंमध्ये राहुल गांधी आणि रामेश्वर जेवण करताना दिसत आहेत. यादरम्यान दोघेही बोलत होते.

जुलैच्या शेवटच्या आठवड्यात सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला होता, ज्यामध्ये रामेश्वर रडताना दिसत होते. वास्तविक रामेश्वर हे आझादपूर भाजी मंडईत टोमॅटो घेण्यासाठी गेले होते आणि त्यादरम्यान टोमॅटोचे भाव खूप वाढले होते. एका मीडिया चॅनलशी बोलताना त्यांनी सांगितले होते की, माझ्याकडे पैसे नाहीत. त्यामुळे मी इतर कोणतीही वस्तू खरेदी करू शकत नाही. हे सांगताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Pune tribal students protesting at the government tribal hostel in Manjari
Shaina NC on Rahul Gandhi UCC
Rahul Gandhi Shirt Shoes Brand
Rahul Gandhi Highlights Women’s Rights and Freedom at Students Ki Goonj
Marathi News Esakal
www.esakal.com