कर्जमाफीची घोषणा राष्ट्रीय स्तरावर नाही : नायडू 

पीटीआय
शनिवार, 18 मार्च 2017

हैदराबाद : उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीदरम्यान भाजपने जाहीर केलेली कर्जमाफीची योजना ही केवळ त्या राज्यासाठी मर्यादित असून, ती केंद्र सरकारची राष्ट्रीय योजना नाही, असे केंद्रीय माहिती व प्रसारणमंत्री वेंकय्या नायडू यांनी शनिवारी स्पष्ट केले. 

ते म्हणाले, ''उत्तर प्रदेशमधील निवडणुकांच्या प्रचारादरम्यान पंतप्रधानांनी राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचे आश्‍वासन दिले आहे. तेथे सरकार स्थापन झाल्यावर यावर सकारात्मक विचार करून त्याची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न भाजप सरकार निश्‍चितपणे करेल.

ही योजना राष्ट्रीय पातळीवरील नसून केवळ त्या राज्यासाठी मर्यादित आहे. संसद अधिवेशनात लोकसभेत या प्रश्‍नावर गदारोळ माजवून सरकारला 'लक्ष्य' करण्याचा प्रयत्न विरोधक करीत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर नायडू यांनी आज हा खुलासा केला. 

राज्यसभेचे कामकाज सुरू असताना विरोधी पक्षांच्या सदस्यांनी उत्तर प्रदेशमधील शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेवर आक्षेप घेत देशातील सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा मागणी केली होती. यामुळे शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचे प्रमाण कमी होईल, असा विश्‍वासही व्यक्त केला होता. त्यावर बोलताना नायडू म्हणाले, की कर्जमाफीचा निर्णय राज्याची आर्थिक परिस्थिती व साधनांची उपलब्धता यावर अवलंबून आहे. स्थानिक पातळीवर यासंबंधीचा निर्णय राज्ये घेऊ शकतात. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: venkaiah naidu Loan waiver for farmers