Rajyasabha : राज्यसभेत सभापती धनखड-खर्गे यांच्यात शाब्दीक चकमक

चीनच्या कथित घुसखोरीवर संसदेत चर्चा मागणारे विरोधक व चर्चेला ठाम नकार कायम ठेवणारे सरकार यांच्यातील वादाने व गोंधळाने राज्यसभेत आजही बहुतांश शून्य काळाचे कामकाज पाण्यात गेले.
jagdeep dhankhar and mallikarjun Kharge
jagdeep dhankhar and mallikarjun Khargesakal
Summary

चीनच्या कथित घुसखोरीवर संसदेत चर्चा मागणारे विरोधक व चर्चेला ठाम नकार कायम ठेवणारे सरकार यांच्यातील वादाने व गोंधळाने राज्यसभेत आजही बहुतांश शून्य काळाचे कामकाज पाण्यात गेले.

नवी दिल्ली - चाळीस वर्षे वकिली केल्याने मला अजिबात राग येत नाही. पण सभागृहातील सध्याच्या वातावरणाने मी कांहीसा हताश, हैराण झालो आहे, असे सांगणारे राज्यसभेचे नवनिर्वाचित सभापती जगदीप धनखड आणि, तुम्ही सदैव नियमांचा दाखला देता. पण याच सभागृहाच्या काही प्रथा, परंपराही आहेत. राष्ट्रीय सुरक्षेचा गंभीर प्रश्न उद्भवतो तेव्हा तो विषय साऱया नियमांच्या पलीकडे असतो म्हणूनच आम्ही चर्चा मागत आहोत, असे त्यांना त्याच क्षणी अत्यंत स्पष्टपणे सांगणारे विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्यात आज जोरदार शाब्दीक चकमक झडली.

चीनच्या कथित घुसखोरीवर संसदेत चर्चा मागणारे विरोधक व चर्चेला ठाम नकार कायम ठेवणारे सरकार यांच्यातील वादाने व गोंधळाने राज्यसभेत आजही बहुतांश शून्य काळाचे कामकाज पाण्यात गेले. सरकारच्या हटवादी भूमिकेच्या निषेधार्थ काँग्रेस व बहुतांश विरोधकांनी राज्यसभेतील कामकाजावर उर्वरीत सर्व काळासाठी बहिष्कार टाकला. विरोधकांच्या अनुपस्थितीत आदिवासी कल्याण मंत्री अर्जुन मुंडा यांनी दुपारच्या सत्रात शेरोशायरीतून विरोधकांवर टीका केली.

तुम्ही मला व सभागृहनेत्यांना आपल्या दालनात बोलावून चर्चेचा प्रस्ताव दिला आहे. मात्र चीनच्या घुसखोरीचा मुद्दा ` आत` चर्चा करण्याचा नसून साऱाय देशासमोर, सभागृहात चर्चा करण्याचा आहे. पूर्ण देशाला माहिती व्हायला हवी की सीमेवर चीनने कसे पूल बांधलेत, कोणकोणती बांधकामे केलीत. समोरच्यापेक्षा जास्त देशभक्त इकडे (विरोधी बाकांवर) आहेत, असा टोला खर्गे यांनी लगावला. सभागृह नेते पियूष गोयल यांनी विरोधकांवर टीका केली.

राज्यसभा सभापती म्हणून आपल्या पहिल्याच अधिवेशनात धनखड यांना बहुसंख्येने असलेल्या विरोधकांचा संताप म्हणजे काय, याचे दर्शन आज घडले. या दरम्यान काँग्रेस सदस्य व शिवसेना नेते संजय राऊत यांचे त्यांच्याशी जोरदार शाब्दीक खटके उडाले. महिला सदस्यांबद्दल वापरलेल्या काही शब्दांनी राऊत प्रचंड संतापले होते. एका क्षणी धनखड इतके संतापले की त्यांनी काँग्रेस नेते के सी वेणूगोपाल यांना तीव्र तंबी दिलीच, पण हात जोडून फक्त उभ्या असलेल्या रजनी पाटील यांना, मॅडम (अशी कारवाई होईल की) तुम्हाला जीवनभर पश्चात्ताप करावा लागेल, इतके तीक्ष्ण शब्द वापरले. मी जेव्हा कारवाई करतो तेव्हा मी कधीही फेरविचार करत नाही हा माझा इतिहास आहे असेही धनखड म्हणाले. आजचा तुमच्या वर्तनाचा व्हिडीओ तुम्ही तुमचे कुटुंबीय व परिचितांना पाठवा की आम्ही संसद सदस्य कसे वर्तन करतो, असे धनखड गरजले. त्यानंतर आणखी गोंधळ सुरू झाला.

खर्गे म्हणाले की आम्ही तुमचा अनादर करत नाही. संसदीय कामकाजात सरकार व विरोधकांत असे खटके उडतातच. पण तुम्ही आमच्यावर संतापता. तुम्ही मला बोलण्यास संधी दिल्याबद्दल धन्यवाद, असे खर्गे यांनी सांगताच धनखड यांनी, मला धन्यवाद म्हणण्या आधी तुम्ही हे निश्चित करा की तुमचे सदस्य नियम पाळून कृपा करतील, असे प्रत्युत्तर देताच वातावरण पुन्हा तापले.

संसदेत पुन्हा मास्क बंधनकारक !

चीन व युरोप अमेरिकेत पुन्हा हाहाकार उडविणाऱया कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे रूग्ण भारतात आढळल्यावर केंद्र सरकार अत्यंत जागरूक झाले आहे. संसदेत मागील अधिवेशनापासून मास्क वापरण्याची सक्ती शिथील करण्यात आली होती. मात्र आजपासून संसद भवन परिसरात पुन्हा मास्क वापरणए बंधनकारक करण्यात आले. संसदीय सचिवालयाचे सर्व अधिकारी-कर्मचारी, पोलिस व संसदीय सुरक्षा कर्मचारी, उपहारगृहांतील कर्मचारी, संसद कामकाज पाहण्यास आलेले अभ्यागत या सर्वांसाठी मास्क वापरणए बंधनकारक करण्यात आले होते. दोन्ही सभागृहांच्या इनर लॅबीमध्ये सॅनिटायजर पुन्हा एकदा दिसू लागले. राज्यसभा सचिवालयाने तर जेथून खासदार वरिष्ठ सभागृहात प्रवेश करतात तेथे मास्क घेऊन एका कर्मचाऱयालाच तैनात केले होते. हा कर्मचारी मास्क नसलेल्या प्रत्येक खासदाराला मास्क देऊन सभागृहात तो आवर्जून वापरण्याची नम्र विनंती करत होता.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com