'बाहुबली'ची देवसेना क्रिकेटरच्या प्रेमात; लवकरच लग्न?

वृत्तसेवा
Sunday, 9 February 2020

बाहुबली चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रभास आणि अनुष्काच्या अफेअर्सच्या चर्चा रंगत असतानाच ती एका क्रिकेटरच्या प्रेमात पडली असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.

चेन्नई : दाक्षिणात्य अभिनेत्री अनुष्का शेट्टी केवळ दक्षिणेतच नाही तर संपूर्ण भारतात लोकप्रिय झाली. देवसेना या चित्रपटानंतर तिला खूप प्रसिद्धी मिळाली. या चित्रपटासोबतच अनुष्का खासगी आयुष्याबद्दलही बऱ्याच चर्चा झाल्या. बाहुबली चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता प्रभास आणि अनुष्काच्या अफेअर्सच्या चर्चा रंगत असतानाच ती एका क्रिकेटरच्या प्रेमात पडली असल्याच्या चर्चांना वेग आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

बाहुबली या चित्रपटात अनुष्काने देवसेनेची भूमिका साकारली आहे. प्रभास आणि अनुष्का या दोघांनीही या चर्चा अफवा असल्याचं म्हणत दोघांचे अफेअर असल्याच्या चर्चांना विराम दिला आहे. त्यानंतर आता अनुष्काच्या लग्नाविषयीची जोरदार चर्चा असून ती एका क्रिकेटरशी लग्नगाठ बांधणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

कात्रज घाटात शिवशाही बस बंद पडली अन्...

हा क्रिकेटर उत्तर भारतातील असल्याचं सांगण्यात येत आहे. एकीकडे अनुष्का तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र असून दुसरीकडे लग्नाचीही तयारी जोरदार सुरु असल्याच्या चर्चांना वेग आला आहे. अनुष्काने मात्र अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. तत्पूर्वी, बाहुबली या चित्रपटानंतर अनुष्का आणि प्रभासच्या लग्नाविषयीच्या चर्चांना उधाण आलं होते. या चर्चांना विराम मिळाल्यावर प्रभासचे एका दाक्षिणात्य अभिनेत्रीसोबत तर अनुष्काचे क्रिकेटरसोबत नाव जोडले जात आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Anushka Shetty likely to get hitched to an Indian cricketer