
ज्ञानवापीमध्ये सापडलेलं शिवलिंग १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक, VHP चा दावा
विश्व हिंदू परिषदेचे (VHP) प्रमुख आलोक कुमार यांनी ज्ञानवापी प्रकरणावरील सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला सहमती दर्शवली असून, ज्ञानवापी मशिदीत सापडलेले शिवलिंग 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याचे सिद्ध करण्यास हिंदू पक्ष पूर्णपणे सक्षम असेल, असा दावा केला आहे. ते म्हणाले की, ही बाब सोपी आहे, यासाठी गंभीर आणि अनुभवी न्यायाधीशांची गरज आहे. जिल्हा न्यायालयही याप्रकरणाकडे लक्ष देईल, असे न्यायालयाने म्हटले आहे.
ज्ञानवापी मशिदीत सापडलेले शिवलिंग हे ज्योतिर्लिंगांपैकी एक असल्याचे सिद्ध करण्यासाठी आमच्याकडे पुरेसे पुरावे असल्याचे विहिंप प्रमुख म्हणाले. ते म्हणाले की, ज्या बाजूला नंदी दिसतो, त्याच बाजूला ज्योतिर्लिंग असल्याचा उल्लेख पुराणातही आहे. ते म्हणाले की, मुघलांनी मंदिरावर हल्ला करून त्याचे नुकसान केले आणि तेथे वाजूखाना बांधला. आमच्याकडे असलेले पुरावे न्यायालयाला दिले जातील आणि सत्य काय ते न्यायालय ठरवेल, असे कुमार म्हणाले. स्थानिक आयुक्तांचा अहवाल घेण्याचे अधिकार न्यायाधीशांना देण्यात आले असून ते मूळ ज्योतिर्लिंग असल्याचे आम्ही सिद्ध करू, असे ते म्हणाले. 1991 चा कायदा ज्ञानवापी मशीद प्रकरणात लागू होणार नाही, असा दावा विहिंप नेत्याने केला.
हेही वाचा: '15 दिवसांत इमारत पाडा नाहीतर...'; राणा दाम्पत्याला पालिकेचा इशारा
सर्वोच्च न्यायालय काय म्हणाले?
वाराणसीचे जिल्हा न्यायाधीश आता ज्ञानवापी मशीद प्रकरणाची सुनावणी करणार आहेत. सर्वोच्च न्यायालयाने याबाबतचे आदेश दिले आहेत. मशिदीत नमाज चालूच राहील, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे कथित शिवलिंग असलेला परिसर पूर्णपणे सील करण्यात येणार आहे. 17 मे पर्यंत ही स्थिती कायम ठेवावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच अंतरिम आदेश लागू राहील तसेच वाजूची व्यवस्था करा असे न्यायालयाने सांगितले आहे. या प्रकरणावर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, यूपी न्यायिक सेवांचे वरिष्ठ आणि अनुभवी न्यायिक अधिकारी या प्रकरणाची सुनावणी करतील. सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, या प्रकरणाची संवेदनशीलता लक्षात घेऊन हे प्रकरण दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ विभाग वाराणसी येथून जिल्हा न्यायाधीश वाराणसीकडे वर्ग करण्यात येत आहे.
हेही वाचा: आर्ची आली आर्ची.. रिंकू राजगुरुचा नवा चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित..
Web Title: Vhp Claims That Shivling Found In Gyanvapi Mosque Is One Of 12 Jyotirlingas
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..