
आर्ची आली आर्ची.. रिंकू राजगुरुचा नवा चित्रपट या दिवशी होणार प्रदर्शित..
Rinku Rajguru : मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या अभिनयानं कमी वेळेत लोकप्रिय झालेली अभिनेत्री म्हणून रिंकु राजगुरुचं (rinku rajguru) नाव घेता येईल. प्रसिद्ध मराठी चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे दिग्दर्शित 'सैराट' (sairat) या चित्रपटामध्ये रिंकुनं भूमिका केली होती. तिचा तो पहिला चित्रपट. त्यानंतर तिनं मागे वळून पाहिलं नाही. सध्याच्या घडीला मराठी अभिनेत्रींमध्ये ती आघाडीची अभिनेत्री आहे.वेबसीरिज असो वा चित्रपट रिंकुनं दमदारपणे आपल्या अभिनयानं प्रेक्षकांना जिंकून घेतलं आहे. नुकत्याच येऊन गेलेल्या झुंड (jhund) या चित्रपटातही रिंकूने आपल्या अभिनयाची जादू दाखवली. त्यानंतर रिंकूचा नवा चित्रपट कधी रिलीज होणार याकडे प्रेक्षकांचे लक्ष लागले होते, अखेर ही प्रतीक्षा संपली असून रिंकूने स्वतः याबाबत माहिती दिली आहे.
हेही वाचा: 'मावशी जोमात सगळे कोमात' मावशी आणि वल्लीचा हा सदाशिव पेठी व्हिडिओ बघाच..
रिंकूच्या या नव्या चित्रपटाचं नाव आहे 'आठवा रंग प्रेमाचा'. या चित्रपटाचं पोस्टर रिंकूने स्वतः आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलं आहे. 'तिच्या प्रेमाचा एक नवा पैलू...'कृतिका'च्या दमदार भूमिकेत येत आहे रिंकू राजगुरू. टीजर येत आहे सोमवारी, चुकवू नका!' असे कॅप्शन तिने या पोस्टला दिले आहे. या चित्रपटामध्ये रिंकू 'कृतिका' ही भूमिका साकारणार आहे. चित्रपटाची निर्मिती राकेश राऊ, समीर कर्णिक, आशिष भालेराव यांनी केली आहे. तर चित्रपटाचे दिग्दर्शन खुशबू सिन्हा यांनी केले आहे. 17 जून रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. (rinku rajguru new movie athava rang premacha released soon )
सैराट चित्रपटामुळे रिंकूला विशेष लोकप्रियता मिळाली. या चित्रपटामध्ये रिंकूनं 'आर्ची' ही भूमिका साकारली होती. त्यांनतर रिंकूने दाक्षिणात्य भाषेतही काही चित्रपट केले. केवळ चित्रपट नाही तर वेब सिरीज मधेही तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली.आज केवळ मराठीच नाही तर हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपट सृष्टीतही रिंकू ने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
Web Title: Rinku Rajguru New Movie Athava Rang Premacha Release Soon
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..