प्रवीण तोगडिया यांचा सक्रीय राजकारणात प्रवेश

वृत्तसंस्था
मंगळवार, 23 ऑक्टोबर 2018

नवी दिल्ली : विश्व हिंदू परिषदेचे माजी नेते प्रवीण तोगडिया यांनी आज (मंगळवार) सक्रीय राजकारणात प्रवेश केला. याबाबतची घोषणा तोगडिया यांनी स्वत: केली. ''आपण राजकारणाच्या मुख्य प्रवाहात प्रवेश करत आहे. माझ्या नव्या पक्षाची घोषणा लवकरच केली जाईल'', असे त्यांनी सांगितले.

अयोध्या येथे समर्थकांशी संवाद साधताना तोगडिया बोलत होते. ते म्हणाले, ''ज्या लोकांनी राम मंदिराच्या नावावर शपथा घेतल्या. अशा लोकांनी दिल्लीत 500 कोटी रुपयांचे कार्यालय बनविले आहे. तर भगवान राम एका तंबूत उघड्या आकाशात राहत आहेत''.

तसेच ते पुढे म्हणाले, ''आम्ही 2019 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत सहभाग घेणार आहोत. आमचे संपूर्ण लक्ष हे राम मंदिर, काशी आणि मथुरा या मुद्यांवर असेल. मी नव्या पक्षाची घोषणा लवकरच करेन. जेव्हा आमचा पक्ष आघाडीवर येईल. तेव्हा आम्ही मुस्लिमांना अल्पसंख्यांचा दिलेला दर्जा काढून टाकू''.

Web Title: VHP Pravin Togadia joins active politics