कुलगुरू डॉ. धारुलकर अडकले लाचप्रकरणात?; स्टिंग ऑपरेशनने खळबळ

टीम ई-सकाळ
Friday, 6 September 2019

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे माजी प्रोफेसर डॉ. वि. ल. धारुलकर वादात सापडले आहे. सध्या त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू असलेल्या डॉ. धारुलकर हे एका स्टिंग ऑपरेशनमध्ये लाच घेताना सापडले आहेत. त्रिपुरातील वनगौर्ड न्यूज या स्थानिक वृत्तवाहिनीने हे स्टिंग ऑपरेशन केले आहे.

कोलकाता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पत्रकारिता विभागाचे माजी प्रोफेसर डॉ. वि. ल. धारुलकर वादात सापडले आहे. सध्या त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरू असलेल्या डॉ. धारुलकर हे एका स्टिंग ऑपरेशनमध्ये लाच घेताना सापडले आहेत. त्रिपुरातील वनगौर्ड न्यूज या स्थानिक वृत्तवाहिनीने हे स्टिंग ऑपरेशन केले असून, विद्यापीठाच्या छपाईचे कंत्राट देण्यासाठी त्यांनी लाच घेतल्याचे स्टिंग ऑपरेशनमध्ये स्पष्ट झाले आहे. चेन्नईतील द हिंदू या वृत्तपत्राने ही बातमी प्रसिद्ध केली आहे.

#banetflixinIndia हिंदूंना नेटफ्लिक्सवर बंदी घाला; सोशल मीडियावर ट्रेंड

स्टिंग ऑपरेशनमध्ये झाला गौप्यस्फोट
द हिंदू वृत्तपत्राने दिलेल्या बातमीनुसार डॉ. धारुलकर यांनी या गंभीर आरोपांवर कोणतेही भाष्य केलेले नाही. तसेच विद्यापीठाच्या जनसंर्क विभागातूनही यावर कोणतिही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. स्टिंग ऑपरेशनमधील व्हिडिओमध्ये डॉ. धारुलकर यांच्या कुलगुरू कक्षातील आणि कोलकात्यातील प्रिंटिंग व्यवसायिक सुरेंद्र सेठिया यांच्या निवासस्थानातील व्हिडिओ प्रसारित करण्यात आले आहेत. डॉ. धारुलकर यांनी ६० लाख रुपयांच्या कंत्राटामध्ये १० टक्के लाच मागितल्याचे स्टिंग ऑपरेशनमध्ये दिसत आहे.

Video : पंतप्रधान मोदींनी नाकाराला स्पेशल सोफा; म्हणाले, ‘खुर्चीच बरी’

या संदर्भात वनगौर्ड न्यूजचे संपादक सेवक भट्टाचर्जी यांनी, ‘आमच्याकडे डॉ. धारुलकर यांच्या विरोधात आणखी ठोस पुरावेत आहेत.’ असा दावा केला आहे. विद्यापीठाच्या अनेक कंत्राटांच्या मोबदल्यात डॉ.धारुलकर लाच मागत असल्याचे भट्टाचर्जी यांचा आरोप आहे, अशी माहिती द हिंदू वृत्तपत्राने दिली आहे. डॉ. धारुलकर मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार करत आहेत आणि आमचे चॅनेल त्याविरोधात आवाज उठवत आहे. कुलगुरूंशी तडजोड करण्यासाठी आमच्याकडे कोणी मध्यस्थ नाही, असा टोलाही भट्टाचर्जी याने लगावलाय. दरम्यान, हा सगळा प्रकार अपमानजनक असून, त्या विरोधात संबंधितांनी योग्य कारवाई करावी, अशी मागणी ज्येष्ठ वकील रघुनाथ मुखर्जी यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: vice chancellor of tripura university dr. v. l. dharurkar got while taking bribe