Video : पंतप्रधान मोदींनी नाकाराला सोफा म्हणाले, 'खुर्चीच बरी'

टीम ई-सकाळ
Friday, 6 September 2019

व्लादिवोस्तोक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने भारत आणि रशिया संबंध आणखी मजबूत होत आहेत. दोन्ही देशांदरम्यान या दौऱ्यात १५ सामंजस्य करार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यात ईस्ट इकॉनॉमिक फोरमला ही हजेरी लावली आहे. या दोऱ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यात त्यांनी स्वतःसाठीची विशेष बैठक व्यवस्था नाकारली आहे.

व्लादिवोस्तोक : पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या रशिया दौऱ्यावर आहेत. या दौऱ्याच्या निमित्ताने भारत आणि रशिया संबंध आणखी मजबूत होत आहेत. दोन्ही देशांदरम्यान या दौऱ्यात १५ सामंजस्य करार झाले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दौऱ्यात ईस्ट इकॉनॉमिक फोरमला ही हजेरी लावली आहे. या दोऱ्यातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. त्यात त्यांनी स्वतःसाठीची विशेष बैठक व्यवस्था नाकारली आहे.

इंदापूरचं राजकारण तापलं; सुप्रिया सुळेंचे हर्षवर्धन पाटील यांना आव्हान (व्हिडिओ)

सोफा हटविण्याचे आदेश
रशिया दौऱ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वेगवेगळ्या सत्रात अनेक बैठकांना उपस्थिती लावली आहे. ईस्ट इकॉनॉमिक फोरममध्ये पंतप्रधान मोदींनी केलेले भाषण विशेष गाजले. तत्पूर्वी, त्यांनी फोरममध्ये समाविष्ठ असलेल्या देशांच्या प्रतिनिधींशीही चर्चा केली आहे. या दौऱ्यात वेगवेगळ्या सत्रांमध्ये सहभागी होताना एका ठिकाणी आयोजकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची विशेष बैठक व्यवस्था केली होती. पण, पंतप्रधान मोदींनी ती नम्रपणे नाकारली. पंतप्रधान मोदींसाठी मधोमध सोफा आणि इतरांसाठी खुर्च्यांची व्यवस्था करण्यात आली होती. पंतप्रधान मोदींनी तो सोफा हटविण्याचे आदेश दिले. त्यानंतर स्वतःसाठीही खुर्चीचीच व्यवस्था करून पुढे फोटो सेशन केले.

कोल्हापुरात मधुरिमाराजेंच्या उमेदवारीसाठी काँग्रेसचे प्रयत्न

दुसऱ्या महायुद्धाच्या विजयोत्सवात मोदी
परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रवीश कुमार यांनी ट्विटरच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याची माहिती दिली. रवीश कुमार यांनी केलेल्या टि्वट नुसार दोन्ही भारत आणि रशिया यांच्यात १५ सामंजस्य करार झाले आहेत. तसेच पंतप्रधान पुढच्या वर्षी पुन्हा रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. पुढच्यावर्षी रशिया दुसऱ्या महायुद्धातील विजयाचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. रशियाच्या विजयाला ७५ वर्षे पूर्ण होत आहे. या कार्यक्रमासाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी पंतप्रधान मोदींना विशेष आमंत्रण दिले आहे, अशी माहिती रवीशकुमार यांनी दिली.

बंदी हटविल्यानंतर तीन डावांतच 'तो' झाला नंबरवन

हस्तक्षेप खपवून घेणार नाही : पंतप्रधान मोदी
संरक्षण, कृषी, पर्यटन आणि व्यापार क्षेत्रात दोन्ही देशांमधील संबंध आणखी दृढ होणार आहेत, अशी आशा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत व्यक्त केली. ते म्हणाले, ‘भारत आणि रशिया यांच्यातील ही आतापर्यंतची २०वी संयुक्त बैठक आहे. दोन्ही देशांचे संबंध शिखरावर नेण्याचा आमचा प्रयत्न आहे. भारतात रशियाच्या मदतीने न्युक्लिअर प्लँट उभार राहत आहेत. आम्ही दोन्ही देशांचे संबंध राजधानीच्या शहरांच्या पलिकडे नेण्याचा प्रयत्न करत आहोत. अंतराळ क्षेत्रातही आमचे परस्पर संबंध वाढत आहेत. दोन्ही देश आमच्या अंतर्गत विषयांमध्ये कोणत्याही बाहेरच्या देशाचा हस्तक्षेप आम्ही खपवून घेणार नाही.’ काश्मीरसाठीचे कलम ३७० रद्द केल्यानंतर पाकिस्तानने हा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर उपस्थित केला होता. काही दिवसांपूर्वी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या विषयात मध्यस्थी करण्याची तयारी दाखवली होती. पण, पंतप्रधान मोदींनी ट्रम्प यांच्यासोबतच्या पत्रकार परिषदेतच हा, आमचा अंतर्गत प्रश्न असल्याचे ठणकावून सांगितले होते. त्याच भूमिकेचा मोदींनी पुतीन यांच्यासोबत असताना पुनरुच्चार केला आहे.   


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pm narendra modi russia tour rejects sofa viral video social media