
Summary
उपराष्ट्रपती निवडणुकीत बहुमत नसेल म्हणून एनडीएने विरोधकांकडे मतदानाची विनंती केली असल्याचा संजय राऊतांचा दावा.
एनडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश बी. सुदर्शन रेड्डी हे विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार.
राऊत यांनी राधाकृष्णन यांच्या राज्यपाल कार्यकाळातील घटनांचा उल्लेख करत "हुकूमशाहीविरोधातील लढा" असल्याचे स्पष्ट केले.
शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी दावा केला की, राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) चे नेते उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधी पक्षांशी संपर्क साधत आहेत कारण सत्ताधारी आघाडीला बहुमत मिळणार नाही असे त्यांना वाटते. दिल्लीत पत्रकारांशी बोलताना राऊत म्हणाले की, विरोधी आघाडी इंडियाची संख्यात्मक ताकद फार कमी नाही.