सुषमा स्वराज यांच्या आठवणीत भावूक झाले उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, शेअर केला PHOTO

कार्तिक पुजारी
Monday, 3 August 2020

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये सुषमा स्वराज व्यंकय्या नायडू यांना राखी बांधताना दिसत आहेत.

नवी दिल्ली- रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर राज्यसभा अध्यक्ष आणि उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या फोटोमध्ये सुषमा स्वराज व्यंकय्या नायडू यांना राखी बांधताना दिसत आहेत. नायडू यांनी ट्विटमध्ये एक भावूक संदेश लिहिला आहे. प्रिय बहीण सुषमा, तुला आज खूप आढवण करत आहे..., असं ते ट्विटमध्ये म्हणाले आहेत. दरवर्षी रक्षाबंधन दिवशी सुषमा स्वराज व्यंकया नायडू यांना राखी बांधायच्या. त्यामुळे आज नायडू भावूक झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 

अयोध्या: पंतप्रधान मोदींसह केवळ 5 व्यक्ती असणार व्यासपीठावर

राज्यसभेमध्ये बोलताना व्यंकया नायडू यांनी सुषमा स्वराज यांना श्रद्धांजली वाहिली होती. त्या माझ्या बहिणीसारख्या होत्या, त्या दरवर्षी मला राखी बांधायच्या असं ते म्हणाले होते. मात्र, यावर्षी मला ते भाग्य लाभणार नाही, असं नायडू म्हणाले आहेत. सुषमा स्वराज यांचा 6 ऑगस्ट 2019 रोजी रक्षाबंधनच्या एक आठवड्याआधी मृत्यू झाला होता. त्यांच्या अचानक जाण्याने सगळ्यांना धक्का बसला होता. 

नायडूंनी माजी केंद्रीय मंत्री सुषमा स्वराज या अचानक गेल्यानंतर त्यांचा 'उल्लेख सक्षम' प्रशासक आणि 'लोकांचा आवाज' असा केला होता. सुषमा स्वराज या ट्विटरवर खूप सक्रिय असायच्या. त्या लोकांना तात्काळ प्रतिसाद द्यायच्या. त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी ट्विटर हे सोप माध्यम ठरलं होतं. याद्वारे सुषमा स्वराज यांनी अनेकांच्या समस्या ऐकून घेतल्या होत्या आणि त्या सोडवण्याचा प्रयत्न केला होता.

राम मंदिराच्या अशुभ मुहूर्तामुळे अमित शहांना कोरोना; काँग्रेस नेत्याची मोदींना...

सुषमा स्वराज या भाजपमधील मोठ्या आणि प्रसिद्ध नेत्या होत्या. त्यांचा नेहमी हसरा चेहरा सगळ्यांना भावायचा. त्या राज्यसभेच्या 3 वेळा सदस्य होत्या, तर 4 वेळा लोकसभेवर निवडून आल्या होत्या. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात स्वराज यांनी परराष्ट्रमंत्री पद संभाळलं होतं. परराष्ट्रमंत्री संभाळणाऱ्या त्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नंतर दुसऱ्या महिला ठरल्या होत्या. 1998 साली त्यांनी काही काळासाठी दिल्लीचे मुख्यमंत्रीपद संभाळले होते.  भारत सरकारने पद्मविभूषण देऊन त्यांचा सन्मान केला होता. सुषमा स्वराज यांचा 6 ऑगस्ट 2019 रोजी वयाच्या 67 व्या वर्षी ह्रद्यविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला होता. याआधी त्यांनी शारीरिक व्याधींच्या कारणास्तव पंतप्रधान मोदी यांच्या मंत्रिमंडळात समावेश होण्यास नकार दिला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vice President Vankaiah Naidu On Raksha Bandhan sushma swaraj