
पश्चिम बंगालमध्ये राज्य सरकार संचालित दक्षिण कोलकाता लॉ कॉलेजशी संबंधित सामूहिक बलात्काराचा एक प्रकार समोर आला आहे. २५ जूनच्या रात्री कॉलेज कॅम्पसमध्ये एका विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला होता. या सामूहिक बलात्कारप्रकरणी तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यापैकी एक कॉलेजचा माजी विद्यार्थी आहे आणि दोन कर्मचारी आहेत. ही घटना २५ जून रोजी संध्याकाळी ७.३० ते १०.५० दरम्यान घडल्याचे सांगण्यात येत आहे.