कर्नाटकमधील धक्कादायक प्रकार; १६ दलित कामगारांना डांबून ठेवले

कर्नाटकमधील चिक्कमंगळूर जिल्ह्यात सोळा दलितांना कॉफीच्या मळ्यामध्ये अनेक दिवस डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार
victims said BJP Jagdish Gowda and his workers did Dalit workers were detained
victims said BJP Jagdish Gowda and his workers did Dalit workers were detainedsakal

बंगळूर : कर्नाटकमधील चिक्कमंगळूर जिल्ह्यात सोळा दलितांना कॉफीच्या मळ्यामध्ये अनेक दिवस डांबून ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला असून भाजप समर्थक जगदीश गौडा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी हे कृत्य केल्याचे पीडितांनी म्हटले आहे. याच प्रकरणात एका दलित महिलेवर नराधमांनी अत्याचार केल्याने तिला बाळ गमवावे लागले. जगदीश गौडा आणि त्यांचा मुलगा टिळक गौडा या दोघांवर दलित अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या हे दोघेही फरार असून त्यांचा शोध सुरू आहे, असे पोलिसांनी सांगितले. पीडित हे जेनुगड्डे गावातील कॉफी मळ्यात रोजंदारीवर काम करत होते. पोलिसांनी सांगितले की, ‘‘त्यांनी मालकाकडून नऊ लाख रुपये उधार घेतले होते. कर्ज फेडण्यात अपयश आल्याने त्यांना एका खोलीत कोंडण्यात आले होते. गेल्या पंधरा दिवसांपासून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. पीडितांमध्ये चार कुटुंबे असून ज्यात सोळा सदस्यांचा समावेश आहे. हे सर्वजण अनुसूचित जातींमधील आहेत.’’

सुरूवातीला तक्रार मागे घेतली

काही लोक ८ ऑक्टोबर रोजी बलेहोन्नूर पोलिस ठाण्यात आले होते, त्यांनी जगदीश गौडा यांच्याकडून छळ झाल्याचा आरोप केला. परंतु त्या दिवशी नंतर त्यांनी तक्रार मागे घेतली, असे एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. दुसऱ्या दिवशी, गर्भवती महिलेला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. चिक्कमंगळूर येथील पोलिस प्रमुखांकडे नवीन तक्रार दाखल करण्यात आली, असे अधिकाऱ्याने सांगितले. एसपींनी हे प्रकरण आमच्याकडे पाठवल्यानंतर आम्ही प्राथमिक माहिती अहवाल नोंदविला, असे ते म्हणाले. याप्रकरणी विरोधकांनी टीका करताच भाजपने मात्र अंग झटकले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com