हा लोकशाहीचा विजय- केजरीवाल

वृत्तसंस्था
बुधवार, 4 जुलै 2018

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा दिल्लीच्या जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे, अशा आशयाचे ट्विट केजरीवाल केले आहे.

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी समाधान व्यक्त केले आहे. त्यांनी ट्विट करून सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. हा दिल्लीच्या जनतेचा आणि लोकशाहीचा विजय आहे, अशा आशयाचे ट्विट केजरीवाल केले आहे.

आम आदमी पक्षाचे बंडखोर नेते कपिल मिश्र यांनी मात्र न्यायालयाच्या या निर्णयावर नाराजी व्यक्त केली आहे. परत सर्वकाही आहे तसेच राहिले, दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा मिळणार नाही. नायब राज्यपालच राज्याचे शासक राहतील असे मत त्यांनी ट्विट करुन व्यक्त केले आहे.

दरम्यान, ​सतत आंदोलनाच्या पवित्र्यामुळे देशभरातून टीकेचे धनी व्हावे लागलेल्या राजधानी दिल्लीतील सत्ताधारी 'आम आदमी पार्टी'ला (आप) सर्वोच्च न्यायालयाच्या एका निर्णयामुळे आज (बुधवार) थोडा दिलासा मिळाला. 'नायब राज्यपाल एकट्याने राजधानीचा कारभार करू शकत नाहीत', असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयाने दिला. 'नायब राज्यपालांना स्वतंत्ररित्या निर्णय घेण्याचे अधिकार नाहीत', असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले. तसेच, राज्य सरकारच्या धोरणात्मक निर्णयांमध्ये हस्तक्षेप करणे आणि दैनंदिन कारभारासाठी अडथळा आणणेही नायब राज्यपालांच्या अधिकारात नसल्याचे या निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Web Title: This is the victory of democracy says Kejriwal