esakal | Video : पुराच्या पाण्यातही 'बोलेरो'ची दमदार सवारी; आनंद महिंद्राही झाले चकीत!
sakal

बोलून बातमी शोधा

anand mahindra

Video: पुराच्या पाण्यातही 'बोलेरो'ची दमदार सवारी; आनंद महिंद्राही झाले चकीत!

sakal_logo
By
अमित उजागरे

मुंबई : गुजरातमध्ये नुकत्याच झालेल्या पावसामुळं मोठी पूरस्थिती निर्माण झाली होती. या स्थितीत नागरिकांच्या मदतीसाठी सदैव तत्पर असलेल्या पोलिसांना 'महिंद्रा बोलेरो'नं मोठी साथ दिली, याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत पोलीस व्हॅन बोनेटपर्यंत पाण्यात बुडालेली असतानाही दमदारपणे पुढे जाताना दिसत आहे. हा व्हिडिओ खुद्द 'महिंद्रा आणि महिंद्रा'चे चेअरमन आनंद महिंद्रा यांनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ पाहून मी चकीत झालो असं त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलं आहे.

हरिश नामक एका ट्विटर युजरने पुराच्या पाण्यातून मार्ग काढणाऱ्या महिंद्रा बोलेरो गाडीचा व्हिडिओ ट्विट केला आहे. हा व्हिडिओ पोस्ट करताना त्यानं 'महिंद्रा है तो मुमकीन है' असं लिहीत याला कॅप्शनची गरज नाही, असं म्हटलं आहे. तसेच हा व्हिडिओ या व्यक्तीनं राजकोटचे पोलीस आयुक्त, गुजरात पोलीस, राजकोट जिल्हाधिकारी, आनंद महिंद्रा यांना टॅगही केला आहे.

हेही वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदी राष्ट्रपती भवनात पोहोचले; महत्वाची बैठक सुरु

आपल्या ट्विटर हँडलला टॅग केलेला हा व्हिडिओ नंतर आनंद महिंद्रा यांनी रिट्विट केला आणि म्हटलं, "सिरीअसली? नुकत्याच झालेल्या पावसात? मी तर चकितच झालोय" असं कॅप्शन दिलं आहे. महिंद्रा यांनी रिट्विट केल्यानंतर या व्हिडिओला १९ हजारांहून अधिक लाईक्स आले आहेत. तर १३०० पेक्षा अधिक लोकांनी तो रिट्विट केला आहे.

loading image
go to top