esakal | Video: 300 किमी वेगाने पळवली दुचाकी अन्...
sakal

बोलून बातमी शोधा

video made viral by the rider going at a dangerous speed of almost 300 kmph

देशात कोरोना व्हायसमुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे रस्ते रिकामे असल्यामुळे एका युवकाने तब्बल ताशी 300 किमी वेगाने दुचाकी चालवली. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

Video: 300 किमी वेगाने पळवली दुचाकी अन्...

sakal_logo
By
वृत्तसंस्था

बंगळूरः देशात कोरोना व्हायसमुळे लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. लॉकडाऊनमुळे रस्ते रिकामे असल्यामुळे एका युवकाने तब्बल ताशी 300 किमी वेगाने दुचाकी चालवली. संबंधित व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

Video : कोरोना ही अल्लाहनं दिलेली शिक्षा...

व्हिडिओमध्ये संबंधित युवक आपली यमाहा आर1 बाईक तब्बल ताशी 300 किमी वेगाने पळवताना दिसत आहे. आयपीएस अधिकारी संदीप पाटील यांनी हा व्हिडिओ ट्विटरवरून शेअर करत लिहिले की, 'दुचाकीस्वारानेच व्हिडिओ व्हायरल केला आहे. स्वतःचा व दुसऱ्यांचा जीव धोक्यात घालून ईसिटी फ्लायओव्हरवरून जवळपास 300 किमी वेगाने गाडी चालवत होता. सीसीबीने या दुचाकी चालकाचा शोध घेऊन यमाहा 1000 सीसी बाईक जप्त केली आहे.'

दरम्यान, व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी मुनियाप्पा नावाच्या युवकाला अटक केली आहे. मुनियाप्पा हा 10 किमी लांब इलेक्ट्रॉनिक सिटी फ्लायओव्हरवरून ताशी 300 किमी वेगाने दुचाकी चालवत होता. शिवाय, इतर वाहनांना ओव्हरटेक करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. शहरात एक आठवड्यांचा लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यावेळी ही घटना घडली आहे.

Video : ...म्हणून पत्रकारानं घेतली गाढवाची मुलाखत

loading image
go to top