
Court room virtual hearing: कोविडच्या काळात ऑनलाईन मिटिंग्ज हा सर्वांच्या जीवनाचा भाग बनला होता. ऑनलाईन मिटिंग, ऑनलाईन क्लासेस, ऑनलाईन चर्चा वारंवार सुरु होत्या. यामुळं लोकांच्या वैयक्तिक आणि प्रोफेशनल कामाची सीमारेषा धुसर बनल्या होत्या. लोक आपल्या बेडरुममधून, बाथरुममधून किंवा किचनमध्ये काम करताना व्हिडिओ कॉल्सवर बोलताना दिसत होते.
यामध्ये केवळ ऑडिओ ऐकायला येणं पुरेसं नसायचं तर व्हिडिओमध्ये व्यक्ती दिसणं महत्वाचं असायचं. असाच एक व्हर्चुअल मिटिंगचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. अर्थात हायकोर्टातील सुनावणीला एका व्यक्तीनं टॉयलेटमधून लाईव्ह हजेरी लावल्याचा प्रकार घडला आहे. कदाचित कोर्टाची सुनावणी आणि टॉयलेट अशा दोन्ही इमर्जन्सी त्याच्यावर ओढवल्या असाव्यात. पण याचा व्हिडिओ मात्र तुफान व्हायरल झाला आहे.