
Hindi Row: हिंदी भाषा सक्तीकरणाविरोधात आता महाराष्ट्रातील सर्वच विरोधीपक्ष एकत्र यायला सुरुवात झाली आहे. मराठीच्या संरक्षणासाठी ही एकीची मूठ आवळण्यात आली असून यासाठी आखलेल्या कृती कार्यक्रमाला दिग्गज नेते हजेरी लावणार आहेत. हिंदी सक्तीविरोधात स्थापन करण्यात आलेल्या शालेय शिक्षण अभ्यास व कृती समितचे निमंत्रक डॉ. दीपक पवार यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांना पत्र लिहिलं आहे. तसंच त्यांना यासाठी आयोजित सभेला हजेरी लावण्याची विनंती करण्यात आली आहे.