esakal | पीपीई किटमधील माय; जीव जोखमीत टाकून रुग्णांना भरवते अन्न

बोलून बातमी शोधा

पीपीई किटमधील माय; जीव जोखमीत टाकून रुग्णांना भरवते अन्न

पीपीई किटमधील माय; जीव जोखमीत टाकून रुग्णांना भरवते अन्न

sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोनामुळे सध्या देशातील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. आतापर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातच दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढत असल्यामुळे रुग्णालये व आरोग्य यंत्रणेवर त्याचा ताण येत आहे. मात्र, या परिस्थितीतही डॉक्टर व इतरेतर वैद्यकीय कर्मचारी सातत्याने त्यांचं कर्तव्य पार पाडत आहे. विशेष म्हणजे सध्यपरिस्थितीमध्ये प्रत्येक आरोग्य कर्मचारी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता रुग्णांसाठी झटत आहे. सध्या सोशल मीडियावर एका नर्सचा व्हिडीओ चांगलाच चर्चिला जात आहे. आपला जीव धोक्यात घालून ही नर्स कोरोनारुग्णाला चक्क जेवण भरवत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडीओ मध्य प्रदेशच्या राज्य माहिती आयुक्तांनी शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एक नर्स तिच्या जीवाची पर्वा न करता कोविड रुग्णांना जेवण भरवत आहे.

हेही वाचा: पत्नीचे दागिने गहाण ठेवून कोरोनाग्रस्तांना पुरवतोय मोफत ऑक्सिजन

चर्चेत येत असलेल्या व्हिडीओमध्ये एक कोरोनाग्रस्त महिला झोपलेल्या अवस्थेत दिसत असून तिला कृत्रिम ऑक्सिजन प्रणालीवर ठेवण्यात आलं आहे. तसंच या महिलेला एक नर्स स्वत:च्या हाताने जेवण भरवत आहे. विशेष म्हणजे या नर्सने तिच्या कामाप्रती केलेलं समर्पण पाहून अनेकांनी तिचं कौतुक केलं आहे.

दरम्यान, सध्या या नर्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून अनेकांनी तिच्या समर्पण भावनेला सलाम केलं आहे. तसंच सध्याच्या काळात डॉक्टर व इतरेतर वैद्यकीय कर्मचारी सातत्याने त्यांचं कर्तव्य बजावत असल्याचं यावरुन दिसून येत आहे.