esakal | पत्नीचे दागिने गहाण ठेवून कोरोनाग्रस्तांना पुरवतोय मोफत ऑक्सिजन

बोलून बातमी शोधा

पत्नीचे दागिने गहाण ठेवून कोरोनाग्रस्तांना  पुरवतोय मोफत ऑक्सिजन
पत्नीचे दागिने गहाण ठेवून कोरोनाग्रस्तांना पुरवतोय मोफत ऑक्सिजन
sakal_logo
By
शर्वरी जोशी

कोरोना पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात १५ मे पर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या काळात संचारबंदीचा फटका अनेकांना बस असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तर, दुसरीकडे दिवसेंदिवस रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे रुग्णवाहिका, ऑक्सिजन सिलेंडर, बेड यांची कमतरता जाणवत आहे. परंतु, या संकट काळातही अनेक जण शक्य होईल त्यापद्धतीने प्रशासनाला मदत करण्याचा प्रयत्न करत आहे. यामध्ये एका मंडप डेकोरेटरने चक्क त्याच्या पत्नीचे दागिने गहाण टाकून गरजू रुग्णांसाठी ऑक्सिजन सिलेंडरची सोय केली आहे.

सध्या देशातील अनेक भागांमध्ये ऑक्सिजन सिलेंडर आणि बेड यांची मोठ्या प्रमाणावर कमतरता जाणवत आहे. त्यामुळे अनेक जण त्यांना शक्य होईल त्या पद्धतीने प्रशासनाला व रुग्णांना मदत करत आहेत. यामध्येच मंडप डेकोरेटर पास्कल सल्धाना यांनी गरजुंसाठी ऑक्सिजन सिलेंडरची सोय केली आहे.

हेही वाचा: ऑफिसमध्ये रोज झोप येते? जाणून घ्या त्यामागची खरी कारणं

पास्कल सल्धाना गेल्या १८ एप्रिलपासून गरजू रुग्णांची मदत करत आहेत. देशात रुग्णवाहिका, ऑक्सिजन सिलेंडरचा तुटवडा यामुळे रुग्णांचे होणार हाल पाहून पास्कल यांनी गरजू रुग्णांना मदत करण्याचा निर्णय घेतला. इतकंच नाही तर त्यांनी पत्नीचे दागिने गहाण टाकून ८० हजार रुपयांची रक्कम उभी केली. त्यानंतर या पैशांमध्ये ऑक्सिजन खरेदी करुन तो गरजू रुग्णांमध्ये मोफत वाटण्यासा सुरुवात केली.

माझी पत्नी डायलसीस आणि ऑक्सिजन सपोर्टवर आहे. त्यामुळे आमच्याकडे कायम एक अतिरिक्त ऑक्सिजन सिलेंडर असतो. काही दिवसांपूर्वी एका शाळेच्या मुख्यध्यापिकांनी त्यांच्या पतीसाठी माझ्याकडे ऑक्सिजन सिलेंडरची मागणी केली. त्यानंतर मी माझ्या पत्नीच्या संमतीने मुख्यध्यापिकांना सिलेंडर दिला आणि तिथूनच हा मोफत ऑक्सिजन सिलेंडर देण्याचा प्रवास सुरु झाला, असं पास्कल यांनी सांगितलं.

दरम्यान, पास्कल यांच्या पत्नीच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या आहेत. त्यामुळे गेल्या पाच वर्षांपासून त्या डायलसीसीवर आहेत.