esakal | Video: आठ दशकांनंतर दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बचा भीषण स्फोट; आवाजानं थरारलं शहर

बोलून बातमी शोधा

W W 2 bomb blast in england}

जगात आजही दुसऱ्या महायुद्धाच्या विनाशाच्या कथा चर्चिल्या जातात. या युद्धावेळी परस्परविरोधी पक्षांनी एकमेकांच्या ठिकाणांवर महाविनाशक बॉम्बने हल्ले केले होते.

desh
Video: आठ दशकांनंतर दुसऱ्या महायुद्धातील बॉम्बचा भीषण स्फोट; आवाजानं थरारलं शहर
sakal_logo
By
टीम ई-सकाळ

जगात आजही दुसऱ्या महायुद्धाच्या विनाशाच्या कथा चर्चिल्या जातात. या युद्धावेळी परस्परविरोधी पक्षांनी एकमेकांच्या ठिकाणांवर महाविनाशक बॉम्बने हल्ले केले होते. अशाच हल्ल्यातील एक बॉम्ब तब्बल आठ दशकांनंतर इंग्लंडच्या एक्सेटर शहरात सापडला असून त्याचा स्फोट घडवून तो निकामी करण्यात आला. या बॉम्बबाबत माहिती कळाली तेव्हा स्फोटापूर्वी सुमारे २६०० लोकांना घरातून बाहेर काढत सुरक्षित स्थळी हालवण्यात आलं. 

सरकारविरोधात मत व्यक्त करणं म्हणजे देशद्रोह नव्हे - सुप्रीम कोर्ट

बॉम्बची माहिती कळाल्यानंतर त्याला निष्क्रिय करण्याचा प्रयत्न केला गेला. त्यानंतर रिमोट कन्ट्रोलच्या मदतीनं बॉम्बचा स्फोट घडवून आणण्यात आला. या भीषण स्फोटानंतर संपूर्ण अकाश धुराने व्यापलं होतं. हे दृश्य पाहिल्यानंतर लोकांची भीतीने गाळण उडाली होती. याचा एक व्हिडिओ देखील सोशल मीडियात शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये हे दिसत आहे की हा स्फोट किती शक्तीशाली होता. लोकांमध्ये या बॉम्बवरुन बरीच चर्चा सुरु आहे. या बॉम्बचा स्फोट संध्याकाळी ६ वाजता घडवून आणण्यात आला होता. त्याचा आवाज अनेक किमीपर्यंत ऐकू येत होता. 

SC-ST विद्यार्थ्यांसाठी ओडिशा सरकारचा महत्वाचा निर्णय; शिष्यवृत्तीसाठी स्वतंत्र निधीची व्यवस्था

संपूर्ण शहर रिकाम करण्यात आलं

माध्यमातील वृत्तांनुसार, इंग्लंडच्या रॉयल नेव्हीच्या बॉम्ब नाशक पथकाला शुक्रावारी ९ वाजता एक्सेटर विद्यापीठाजवळ ग्लेनथ्रोन रोडवर पाठवण्यात आलं. या टीमला एका इमारतीजवळ दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील दोन जिवंत बॉम्ब आढळून आले. यानंतर शनिवारी संपूर्ण रात्रभर बॉम्ब निकामी करण्याची प्रक्रिया सुरु होती.  त्यानंतर संपूर्ण शहर खाली करण्यात आलं. कारण या बॉम्बची तपासणी करता यावी आणि त्याला दुसऱ्या ठिकाणी नेता यावं. 

मुख्यमंत्र्यांचे टोलेबाज भाषण; 'हा व्हायरस आहे, पुन्हा येईन पुन्हा येईन म्हणतो'

रस्ते बंद करण्यात आले

पोलिसांनी लोकांच्या सुरक्षा लक्षात घेता ४०० मीटरपर्यंत नाकाबंदी केली होती. जवळपासचे सर्व रस्ते बंद करण्यात आले होते. एका निवेदनात सांगण्यात आलं की, पोलिसांना वाटलं होतं की बॉम्ब निकामी करण्याचं काम एका दिवसात पूर्ण होईल. मात्र, त्यानंतर बॉम्ब नाशक पथकालाही पाचारण करण्यात आलं. लोकांनाही सांगण्यात आलं होतं की त्यांनी निश्चिंत रहावं सैन्य, पोलीस आणि त्यांचे इतर सहकारी त्यांच्या सुरक्षेसाठी काम करत आहेत.