Video: अशोका युनिव्हर्सिटीत विद्यार्थ्यांकडून जातीवादी घोषणा? सोशल मीडियातून संतप्त प्रतिक्रिया

slogan-shouting in the Ashoka University: हरियाणातील अशोका युनिव्हर्सिटी पुन्हा चर्चेत आली आहे. युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये काही विद्यार्थ्यांनी जातीवादी घोषणा दिल्याचा आरोप आहे.
Ashoka University
Ashoka University

चंदीगढ- हरियाणातील अशोका युनिव्हर्सिटी पुन्हा चर्चेत आली आहे. युनिव्हर्सिटीच्या कॅम्पसमध्ये काही विद्यार्थ्यांनी जातीवादी घोषणा दिल्याचा आरोप आहे. यासंदर्भातील काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. अनेकांनी यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. युनिव्हर्सिटी प्रशासनाकडून यासंदर्भात निवेदन जारी करण्यात आले आहे. (Videos Show Students Raising Casteist Slogans At Ashoka University widely condemned)

'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओनुसार, काही विद्यार्थ्यांकडून ब्राह्मण आणि बनिया विरोधात घोषणा देण्यात आल्या आहेत. अनेकांनी या विद्यार्थ्यांचा निषेध केला असून कारवाईची मागणी केली आहे. युनिव्हर्सिटी प्रशासनाने देखील या प्रकाराची गंभीर दखल घेतली आहे. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो. शिवाय मतभेदाला देखील स्थान देतो. पण, एकमेकांना आदर देण्याला देखील आम्ही महत्त्व देतो. (slogan-shouting in the Ashoka University)

Ashoka University
JNU Election : डाव्यांचा गड अभेद्य ; ‘जेएनयू’वर पुन्हा फडकला लालबावटा

युनिव्हर्सिटीमधील शांतता आणि एकोपा टिकवून ठेवण्यासाठी आम्ही आवश्यक ते पाऊल उचलू, असं प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. अशोक युनिव्हर्सिटीची स्थापना २०१४ मध्ये झाली होती. प्राध्यापकांच्या राजकीय विचारांमुळे ही युनिव्हर्सिटी चर्चेत आली होती. मार्च २०२१ मध्ये प्रताप भानू मेहता आणि अरविंद सु्ब्रमण्यम यांनी युनिव्हर्सिटीला सोडचिठ्ठी दिली होती.

दाव्यानुसार, विद्यार्थ्यांनी 'आम्हाला जातनिहाय जनगणना हवी' आणि 'ब्राह्मण-बनियावाद मुर्दाबाद'च्या घोषणा दिल्या आहेत. इन्फोसिसचे माजी फायनान्शिल अधिकारी मोहनदास पाई यांनी यासंदर्भात एक्सवर एक पोस्ट केली आहे. अशोक युनिव्हर्सिटीमध्ये इतका जातीय द्वेष का आहे? असा सवाल त्यांनी केला आहे.

Ashoka University
Viral video: वा रे पठ्ठ्यांनो! दारु पिऊन शाळेत आलेल्या शिक्षकाला घडवली अद्दल; व्हिडिओ पाहाच

युनिव्हर्सिटीकडून खेद व्यक्त

युनिव्हर्सिटीने आपल्या निवेदनात म्हटलंय की, व्यक्ती किंवा एखाद्या गटाबाबत द्वेषपूर्ण कृतीचा आम्ही खेद व्यक्त करतो. आम्ही अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करतो, पण ही अभिव्यक्ती अमर्याद नाही. इतरांच्या अधिकारांचा आणि संवेदनशिलतेचा सन्मान आणि आदर आवश्यक आहे. अशोक युनिव्हर्सिटीमध्ये हे तत्व महत्त्वाचं आहे.

कॅम्पसचे वातावरण दुषित करणे, व्यक्ती किंवा गटाला धमकावणे, शत्रूत्व निर्माण होईल अशी कृती करणे अशा कृतींना गंभीर गुन्हा मानला जाईल. युनिव्हर्सिटीमध्ये अनुशासनाचे पालन करणे आवश्यक राहिल, असंही प्रशासनाकडून म्हणण्यात आलं आहे. (Latest Marathi News)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com