
बांगलादेश मुक्ती युद्धात भारतीय लष्कराने पाकिस्तानच्या सैन्याला असा धडा शिकवला की पुन्हा ते भारताकडे नजर वर करुन बघणार नाही. यात आपल्या अनेक जवानांना वीरमरण आले. यापैकी पुण्यात जन्मलेल्या अरुण खेत्रपाल यांनी जो पराक्रम दाखलवला त्यासाठी त्यांना मरणोत्तर सर्वोच्च सैनिक पुरस्कार परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले आहे.
जगदंबेचा उदो करत 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धादरम्यान जखमी परंतु दृढनिश्चयी आणि धैर्यवान सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांनी बोललेले हे शब्द होते. त्यांनी आपल्या गंभीर दुखापतींकडे दुर्लक्ष करून पाकिस्तानचे रणगाडे उध्वस्त केले होते. खेत्रपाल हे जगदंबेचे भक्त होते. इतर सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी युद्धभूमीवर जगदंबेचा उदो उदोच्या जागर केला. अशी माहिती सैन्य अधिकारी रिसालदार प्रयाग सिंग,यांनी एका मुलाखतीत दिली होती.
इतर अधिकाऱ्यांपेक्षा अरुण वयाने लहान होते. 1971 चे युद्ध सुरू होते तेव्हा ते 21 वर्षाचे होते. ते युद्धातील काही बारकावेही शिकले नव्हते. परंतु त्यांनी आपल्या अधिकाऱ्यांशी भांडून युद्धात जाणार असल्याचे सांगितले. त्यांचे धाडस पाहून पाकिस्तानी अधिकारीही त्याला सलाम करू लागले. जो मुलगा शेवटच्या श्वासापर्यंत लढला आणि नंतर परमवीर झाला.
या दिवशी म्हणजेच 16 डिसेंबर 1971 रोजी भारताने पाकिस्तानचा पराभव करून बांगलादेशला विजय मिळवून दिला. पण या दिवशी भारताने स्वतःचा हा मुलगाही गमावला. अरुण यांच्या अदम्य धैर्याची आणि शौर्याची चर्चा केल्याशिवाय १९७१ च्या युद्धाबद्दल बोलणे अपूर्णच आहे.
पंजाब-जम्मू सेक्टरमधील शकरगड येथे झालेल्या लढाईत अरुण यांनी शत्रूचे १० रणगाडे उद्ध्वस्त केले होते. वयाच्या अवघ्या २१व्या वर्षी त्यांना परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आले. त्यांचा जन्म 14 ऑक्टोबर 1950 रोजी झाला होता.
बसंतर नदी, शंकरगढ नावाच्या एका संवेदनशील भागामधून वाहते. पाकिस्तानी सैन्याचा डाव असा होता की, ह्या नदीवरील पूल स्वतः च्या ताब्यात घ्यायचा ज्यामुळे पठाणकोट आणि जम्मू-काश्मीर यांच्यातील संबंध तुटेल आणि भारतीय सैन्य जम्मूला पोहोचू शकणार नाही आणि पाकिस्तानला काश्मीर काबीज करता येईल.
हा डाव ओळखून भारतीय सैन्याने ताबडतोब कारवाईस सुरुवात केली आणि 47 ब्रिगेडला ब्रिजहेड बांधण्याचे काम दिले. ब्रिजहेड म्हणजे पुलाजवळील एक अशी जागा. जिथे सैन्य आपले वर्चस्व स्थापीत करून शत्रूला ब्रिज जवळ येऊ देत नाही. ब्रिजहेडचे काम १५ डिसेंबरला रात्री ९ वाजेपर्यंत पूर्ण झाले.
अरुण यांना त्याचे सहकारी परत बोलवत असताना देखील ते रणगाडे उडवत उडवत पुढे जात होते. त्यात त्यांना वीरमरण आले. एक दोन नाहीतर तब्बल १० रणगाडे त्यांनी उडवले होते. पाकिस्तानला त्यांनी पुढे सरकू तर दिलेच नाही पण शत्रूला एकट्या खेतरपाल यांना रोखण्यासाठी अजून एक बटालियन बोलवावी लागली होती.
अरुण यांनी उडवलेला शेवटचा रणगाडा हा त्यांच्यापासून १०० मीटर दूर होता. जेव्हा अरुण यांना परत येण्याचा आदेश मिळाला तेव्हा त्यांनी एक संदेश देत रेडिओ सेट ऑफ केला, 'सर माझी बंदूक अजूनही फायरिंग करत आहे, जोवर बंदूक फायरिंग करत राहील, मी फायरिंग सुरू ठेवेन.' शेवटी अरुण शहिद झाले. देशाला मात्र युद्धात विजय मिळाला. याच युद्धात अरुण यांचे वडील ब्रिगेडियर एमएल खेतरपाल हे देखील शत्रूंसोबत लढत होते.
अरुण यांच्या हौतात्म्यानंतर ते ज्या टँकमध्ये बसून लढत होते तो टँक आजही अहमदनगर येथे सुरक्षित ठेवला आहे. एनडीएमध्ये त्यांच्या नावाने परेड ग्राउंड आहे. तर आयएमएमध्ये त्यांच्या नावाने ओडिटोरियम तयार करण्यात आला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.