esakal | Vijay Diwas - पंतप्रधान मोदींनी 1971 च्या युद्धातील वीरांना केला सलाम
sakal

बोलून बातमी शोधा

vijay divas pm modi

पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी विजय दिवसानिमित्त विजय ज्योति यात्रा राजधानी दिल्लीतून रवाना केली. विजय ज्योति यात्रेमध्ये चार विजय मशाल एक वर्षाच्या काळात पूर्ण देशातीला छावणी भागांचा दौरा करतील.

Vijay Diwas - पंतप्रधान मोदींनी 1971 च्या युद्धातील वीरांना केला सलाम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

नवी दिल्ली - भारत आणि पकिस्तान यांच्यात 1971 मध्ये झालेल्या युद्धाला 50 वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी दिल्लीतील नॅशनल वॉर मेमोरियलमध्ये स्वर्णिम विजय मशाल प्रज्वलित केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी युद्धातील जवानांना सलाम केला आणि वीरमरण आलेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. 

भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारक इथं स्वर्णिम विजय वर्षाच्या लोगोचे अनावरण केले. स्वर्णिम विजय वर्षाची सुरुवात यासह झाली आहे. पंतप्रधन नरेंद्र मोदी यांनी विजय दिवसानिमित्त विजय ज्योति यात्रा राजधानी दिल्लीतून रवाना केली. विजय ज्योति यात्रेमध्ये चार विजय मशाल एक वर्षाच्या काळात पूर्ण देशातीला छावणी भागांचा दौरा करतील. यात 1971 युद्धातील परमवीर चक्र आणि महावीर चक्र विजेत्या सैनिकांच्या गावांचा समावेश आहे. पुढच्या वर्षी नवी दिल्लीत ही मशाल यात्रा पूर्ण होईल. 

शेतकरी विकतो 57 प्रकारचे गुळ; किंमत मिळते तब्बल 5 हजार रुपये किलो

दरवर्षी 16 डिसेंबर हा दिवस विजय दिवस म्हणून साजरा केला जातो. याच दिवशी भारताने पाकिस्तानविरुद्ध 1971 मध्ये युद्ध जिंकलं होतं. त्यानंतर बांगलादेश अस्तित्वात आला. भाजप सरकारने 2015 मध्ये नॅशनल वॉर मेमोरियलला मंजुरी दिली होती. देशातील सैनिकांसाठी असलेलं हे स्मारक आहे, 1960 मध्ये सशस्त्र दलाने नॅशनल वॉर मेमोरियल तयार कऱण्याचा प्रस्ताव दिला होता. इंडिया गेट आणि अमर जवान ज्योतिच्या जवळच हे नवीन स्मारक उभारण्यात आलं आहे. स्वातंत्र्यानंतर सर्वोच्च बलिदान देणाऱ्या जवानांबद्दल देशाच्या कृतज्ञतेचं प्रतिक हे स्मारक आहे. 
 

हे वाचा - Vijay Diwas: भारताने पाकिस्तानला झुकवून जगाचा नकाशा बदलला होता

विजय दिवसानिमित्त केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या. गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करून म्हटलं की, 1971 मध्ये आजच्याच दिवशी भारतीय सैन्याने साहस आणि पराक्रमाच्या जोरावर मानवी स्वातंत्र्याच्या सार्वभौमिक मूल्यांचे संरक्षण केले आणि जगाच्या नकाशात बदल झाला. इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिलेली ही शौर्यगाथा भारतीयांचा गौरव करत राहिल. विजय दिवसाच्या शुभेच्छा.