1 मार्चला मल्ल्या जेटलींना भेटला, 2 मार्चला लंडनला: राहुल गांधी

Vijay Mallya Met Arun Jaitly In Parliament Central Hall says rahul gandhi
Vijay Mallya Met Arun Jaitly In Parliament Central Hall says rahul gandhi

नवी दिल्ली - 1 मार्चला मल्ल्या जेटलींना भेटला आणि 2 मार्चला तो लंडनला गेला असआ अारोप राहुल गांधी यांनी आज पत्रकार परिषदेदरम्यान केला. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन अरुण जेटलींवर पुन्हा आरोप केले आहेत. मल्ल्या आणि अरुण जेटली यांची संसदेत भेट झाली होती. त्याचबरोर, जेटलींना विजय मल्ल्या लंडनला जाणार असल्याची पूर्ण माहीती जेटलींना होती, असेही राहुल गांधीनी केलेल्या आरोपात म्हटले आहे.

काँग्रेसचे नेते पुनिया म्हणाले कि, माझ्यासमोर अरुण जेटली विजय मल्ल्यांना भेटले. 1 मार्च 2016 रोजी ससंदेच्या सेंट्रल हॉलमध्ये ही भेट झाली. या भेटीचे सीसीटीव्ही चित्रीकरणही उपलब्ध आहे. मी जर खोटे बोललो तर राजकारण सोडून देईन असे पुनिया या पत्रकार परिषदेत म्हणाले. अरुण जेटली खोटे बोलतायत त्यांनी राजीनामा दिला पाहिजे अशी मागणी राहुल गांधी यांनी यावेळी केली आहे. 

त्याचबरोर, यावेळी राहुल गांधी यांनी अरुण जेटलींसह मोदी सरकारवरही हल्लाबोल चढवला. तसेच, यावेळी पुनिया यांनी यावेळी स्पष्ट केले की, 2016 च्या बजेटवेळचा हा विषय आहे. त्यावेळी विजय माल्ल्या हा संसदेमध्ये अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी कोपऱ्यात जवळपास अर्धा तास बोलत होता. विजय माल्या भारत सोडून बाहेर जाण्यापूर्वी दोन दिवस ही भेट झाली होती. त्यानंतर दोन दिवसांनी विजय माल्ल्या भारताबाहेर पळून गेल्याचे वृत्तवाहिन्यांनी दाखविल्याने धक्का बसला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com