Vijay Mallya | मल्ल्याला फक्त २००० रुपये दंड ? चकित होऊ नका, कायदा समजावून घ्या! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Vijay Mallya
मल्ल्याला फक्त २००० रुपये दंड ? चकित होऊ नका, कायदा समजावून घ्या!

मल्ल्याला फक्त २००० रुपये दंड ? चकित होऊ नका, कायदा समजावून घ्या!

सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याप्रकरणी फरार उद्योगपती विजय मल्ल्याला आज न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. केंद्र सरकारने मल्ल्याला जास्तीत जास्त शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे. मल्ल्याने परदेशी खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर केल्याप्रकरणी कोर्टाला चुकीची माहिती दिल्याचं केंद्रानं सांगितलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने आता विजय मल्ल्याला चार महिन्यांचा तुरुंगवास आणि २ हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

हेही वाचा: विजय मल्ल्याला SC चा दणका, 4 महिन्याचा तुरुंगवास, २ हजाराचा दंड

मात्र, केवळ दोन हजार रुपयांचा दंड ऐकून तुम्हीही आश्चर्यचकित झाला असाल. जाणून घ्या याबाबत कायदा काय सांगतो? परदेशी खात्यांमध्ये पैसे ट्रान्सफर करण्याविषयी चुकीची माहिती देणं, तसंच गेल्या पाच वर्षांमध्ये न्यायालयासमोर हजर न होणं हा न्यायालयाचा अवमान असल्याचं सांगत त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं. शिक्षेवर चर्चा करण्यासाठी विजय मल्ल्या आत्तापर्यंत एकदाही न्यायालयासमोर आलेला नाही किंवा त्याच्या बाजूने कोणता वकीलही आलेला नाही. १० फेब्रुवारी रोजीही सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी टाळणाऱ्या मल्ल्याला आपली बाजू मांडण्याची संधी देण्यात आली होती.

हेही वाचा: विजय मल्ल्या दिवाळखोर घोषीत! संपत्ती ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा

कायदा काय सांगतो?

कोर्टाचा अवमान केल्याप्रकरणी जास्तीत जास्त ६ महिन्याच्या कारावासाची शिक्षा सुनावली जाऊ शकते. मल्ल्या प्रकरणात निर्णय़ देताना न्यायमूर्ती यू यू ललित, एस रविंद्र भाट आणि पी एस नरसिंह यांच्या खंडपीठाने सांगितलं होतं की संविधानातल्या अनुच्छेद १४२ आणि १४५ अंतर्गत अशा प्रकारे शिक्षेची कोणतीही मर्यादा निश्चित करता येत नाही. त्याप्रमाणे आता सर्वोच्च न्यायालयाने विजय मल्ल्याला चार महिन्यांचा कारावास आणि २ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आलेला आहे.

Web Title: Vijay Mallya Supreme Court Of India Fine And Imprisonment For Contempt Of Court

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top