मल्ल्यांचे ट्‌विटर हॅक; हॅकरकडून मल्ल्यांचे फोन क्रमांक उघड!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 9 डिसेंबर 2016

नवी दिल्ली : नऊ हजारो कोटी रुपयांचे थकित कर्जे असताना देश सोडून, फरार झालेले मद्य सम्राट विजय मल्ल्या यांचे ट्विटर अकाऊंट हॅक झाले आहे. तसेच हॅकर्सनी मल्ल्या यांच्या संपत्तीच्या माहितीसह त्यांचे दोन संपर्क क्रमांक उघड केले असूत ते क्रमांक मल्ल्यांचेच असल्याचा दावाही केला आहे.

अलिकडेच कॉंग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचे अधिकृत ट्‌विटर अकाउंट हॅक करण्यात आले होते. त्यानंतर आता हॅकर्सनी विजय मल्ल्या यांचे अकाउंट हॅक केले आहे. हॅकरने असभ्य भाषेतील ट्‌विट केल्याने हा प्रकार उघड झाला आहे.

ट्‌विटरवर मल्ल्यांचे @TheVijayMallya या नावाने अधिकृत अकाउंट आहे. या अकाऊंटला लाखो फॉलोअर्सदेखील आहेत. हे अकाऊंट लिजियन नावाच्या एका हॅकर गटाने ट्‌विटर अकाऊंट हॅक केल्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मल्ल्यांनी हॅकर ब्लॅकमेल करत असल्याचा दावा केला आहे. मात्र लिजियन नावाच्या हॅकरकडून ब्लॅकमेल करत नसल्याचे सांगण्यात आले आहे. हॅकरने विजय मल्ल्यांचे ट्‌विटर अकाउंट हॅक केल्यानंतर त्यावर लिंक प्रसिद्ध केल्या असून त्या लिंकद्वारे मल्ल्याची संपत्ती, व्यवसाय, पासपोर्टची संपूर्ण माहिती देण्यात आली आहे. याशिवाय हॅकरने दोन वैयक्तिक पत्ते आणि फोन क्रमांक उघड केले आहेत. तसेच हे क्रमांक मल्ल्यांचे असल्याचा दावा केला आहे. दरम्यान मल्ल्या यांनी त्यांचे अकाऊंट पूर्ववत सुरु केले असून हॅक झाल्याचे मान्य केले आहे.

Web Title: Vijay Mallyas twitter account hacked