Vijay Thalapathy News: विजय थलपतींनी २०२६च्या तामिळनाडू निवडणुकीबाबत केली मोठी घोषणा!

Vijay Thalapathy’s Big Announcement for Tamil Nadu Elections 2026: जाणून घ्या, द्रमुक किंवा भाजपसोबत युती बद्दल काय भूमिका स्पष्ट केली आहे?
Actor Vijay Thalapathy addressing supporters during his announcement on Tamil Nadu Elections 2026.
Actor Vijay Thalapathy addressing supporters during his announcement on Tamil Nadu Elections 2026.esakal
Updated on

Tamil Nadu Elections 2026: तामिळ चित्रपसृष्टीतील दिग्गज अभिनेते विजय थलपती यांचा तमिलागा वेट्ट्री कल्याणगम (टीव्हीके) पक्ष पुढील वर्षी होणाऱ्या तामिळनाडू विधानसभा निवडणुकीत राजकीय पदार्पण करेल. मदुराई येथे झालेल्या पक्षाच्या दुसऱ्या राज्य परिषदेत विजय यांनी संकेत दिले की त्यांचा पक्ष अनेक जागांवर निवडणूक लढवेल.

तसेच विजय थलपती यांनी स्पष्ट केले की त्यांचा पक्ष सत्ताधारी द्रमुक किंवा भाजपसोबत युती करणार नाही. टीव्हीके पूर्णपणे एकट्याने निवडणूक लढवेल असेही त्यांनी सांगितले.

एवढंच नाहीतर विजय थलपती यांनी भाजपला त्यांच्या पक्षाचा "एकमेव वैचारिक विरोधक" आणि द्रमुकला "एकमेव राजकीय विरोधक" असे संबोधले आहे. तसेच त्यांनी हेही ठामपणे सांगितले की २०२६ ची तामिळनाडूतील निवडणूक फक्त द्रमुक आणि टीव्हीके यांच्यातच होईल.

Actor Vijay Thalapathy addressing supporters during his announcement on Tamil Nadu Elections 2026.
Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

या कार्यक्रमात मोठ्या संख्येने चाहते उपस्थित होते आणि विजय यांनी त्यांच्या पक्षाची स्वतंत्रपणे निवडणूक लढण्याची रणनीती सांगितली, कोणत्याही मोठ्या पक्षाशी युती करण्याचा कोणताही हेतू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com