

TVK vs DMK
esakal
Chennai: मोदी सरकारच्या सुधारित मतदारसंघ पुनर्रचना विधेयकाला पाठिंबा देण्याचा निर्णय द्रमुकने घेतल्यानंतर तमिळनाडूतील राजकीय संघर्षाला नवे वळण मिळाले आहे. मुख्यमंत्री विजय यांच्या सत्ताधारी तमिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाने द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पक्षाच्या आयटी विभागाने स्टॅलिन यांचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या गणवेशातील फोटो पोस्ट करत त्यांना ‘सावरकर 2.0’ असे संबोधले आहे.