मृत्यूपूर्वी विकास दुबेने केला होता मोठा खुलासा

वृत्तसंस्था
Friday, 10 July 2020

कानपूर : कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेने मृत्यूपूर्वी एक मोठा खुलासा केल्याची बातमी समोर आली असून एनकाऊंटर होण्यापूर्वी उज्जैनमध्ये केलेल्या चौकशीदरम्यान, त्याने आपला गुन्हा कबूल केला असून तो सीओ देवेंद्र मिश्रा यांच्याविषयी त्याच्या मनात राग होता आणि सीओ देवेंद्र मिश्रा यांच्याविषयी पोलिस खात्यातीलच काही लोक माहिती पुरवत होते. 

कानपूर : कानपूर हत्याकांडातील मुख्य आरोपी विकास दुबेने मृत्यूपूर्वी एक मोठा खुलासा केल्याची बातमी समोर आली असून एनकाऊंटर होण्यापूर्वी उज्जैनमध्ये केलेल्या चौकशीदरम्यान, त्याने आपला गुन्हा कबूल केला असून तो सीओ देवेंद्र मिश्रा यांच्याविषयी त्याच्या मनात राग होता आणि सीओ देवेंद्र मिश्रा यांच्याविषयी पोलिस खात्यातीलच काही लोक माहिती पुरवत होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा

सीओ देवेंद्र मिश्रा यांच्याविषयीच्या व्यक्तीगत गोष्टींची सुद्धा पोलिसांकडून माहिती मिळत असल्याचे विकास दुबेने सांगितले आहे. त्यासोबतच त्याने झालेल्या चौकशीत सीओ देवेंद्र मिश्रा यांची हत्या केली नसल्याचा देखिल धक्कादायक खुलासा केला असून त्याच्यासोबत असणाऱ्या लोकांनी हत्या केल्याचे सांगितले आहे. पोलिस सुत्रांच्या माहितीनुसार विकास दुबे आणि सीओ देवेंद्र मिश्रा यांच्या खूप वेळा विवाद झाला होता. अशा वेळी काही पोलिसांनी विकास दुबेला सीओ देवेंद्र मिश्राविषयी माहिती पुरविण्यात येत होती. मिळालेल्या माहितीनुसार, विकास दुबेने चौकशीदरम्यान, हे कबूल केले होते की, पोलिसांच्या छापेमारीबाबत आधीच माहिती मिळाली होती.
-------------
विकास दुबेच्या एनकाउंटरवर प्रियंका गांधींची प्रतिक्रिया; म्हणाल्या....
-------------
विकास दुबे एनकाऊंटरमध्ये गेला पण.... हे १० प्रश्न अनुत्तरितच !
-------------
दरम्यान, उत्तर प्रदेश पोलिस पथकातील अधिकाऱ्यासह ८ पोलिस कर्मचाऱ्यांच्या हत्याकांडातील प्रमुख सूत्रधार विकास दुबे याचा फिल्मी स्टाइल खात्मा झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेश स्पेशल स्टास्क फोर्स (एसटीएफ) च्या वाहनातून विकास दुबेला मध्य प्रदेशमधून कानपुरच्या दिशेने नेत असताना वेगाने असणारी गाडी (ज्यात विकास दुबेला बसवण्यात आले होते) अचानक पलटी झाली. या अपघातामध्ये विकास दुबेसह वाहनातील काही जवानही जखमी झाले. या अपघातातून सावरत असतानाच मोक्याचा फायदा उठवत विकास दुबेने एसटीएफच्या एका अधिकाऱ्याची पिस्तूल हिसकावून घेतली. त्यानंतर जवान आणि विकास दुबे यांच्यात चकमक झाली. एसटीएफने विकासला पिस्तूल खाली ठेवत सरेंड होण्याची सूचना दिली. मात्र विकास दुबेने याला प्रतिसाद न दिल्याने पोलिसांना त्याचा एन्काउंटर करावा लागला असल्याचे सांगण्यात आले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Vikas Dubey Confesses That He Has Not Killed Co Devendra Mishra