दरड कोसळलेला खांडेपार रस्ता सुरू करण्यासाठी ग्रामस्थ एकत्र

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 1 जुलै 2018

फोंडा येथील केरये - खांडेपार परिसरात आठवड्यापूर्वी दरड कोसळल्याने तेथील महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहन चालकांना तसेच शालेय मुलांना त्रास होत आहे.
 

गोवा- फोंडा येथील केरये - खांडेपार परिसरात आठवड्यापूर्वी दरड कोसळल्याने तेथील महामार्गावरील वाहतूक विस्कळीत होऊन वाहन चालकांना तसेच शालेय मुलांना त्रास होत आहे.

ही वाहतूक पर्यायी रस्त्याने वळविण्यात आल्याने सुमारे 15 किलोमीटर अंतर जादा वाहतूक करावी लागते. त्यामुळे आज सकाळी खांडेपार ग्रामस्थांनी घटनास्थळी जमा होऊन रस्त्याचे काम त्वरित पुर्ण करुन दुचाकी, हलकी वाहने व मिनी बसगाड्याना सकाळी 7 ते 09 ः 30 दुपारी 12 ः 30 ते 2 ः 30 व संध्याकाळी 5 ते 7 ः 30 या वेळेत पोलिसांच्या मदतीने वाहतूक या खांडेपार रस्त्यावरून सुरू ठेवण्याची मागणी केली.

Web Title: The villagers gathered together to start the road