'दयावान' जोडीची मृत्यूची तारीख, वय अन् आजार एकच

वृत्तसंस्था
गुरुवार, 27 एप्रिल 2017

विनोद खन्ना आणि फिरोज खान यांच्या मैत्रीला सुरवात झाली ती 1976 मध्ये आलेल्या 'शंकर शंभू' या चित्रपटाने. या दोघांनी या चित्रपटात भूमिका केली होती.

मुंबई - 'दयावान'मधील शक्ती-शंकर आणि 'कुर्बानी'मधील अमर-राजेश या अजरामर भूमिका साकारणाऱ्या विनोद खन्ना-फिरोज खान या दोघांची मैत्री आपण पडद्यावर पाहिलीच आहे. पण, या दोघांच्या मृत्यूबाबतही असा योगायोग घडला आहे की या दोघांची मृत्यूची तारिख, वय आणि आजार एकच असल्याचे समोर आले आहे.

हिंदी चित्रपटसृष्टीत विनोद खन्ना आणि फिरोज खान हे चांगले मित्र होते. विनोद खन्ना आणि फिरोज खान यांनी 1980 मध्ये दयावान आणि 1988 मध्ये कुर्बानी या चित्रपटांत मित्रांची भूमिका साकारली होती. या दोन्ही चित्रपटांना मोठे यश मिळाले होते. या दोघांच्या निधनाबाबत योगायोग जुळून आला आहे. आठ वर्षांपूर्वी (2009) फिरोज खान यांचे निधन आजच्याच तारखेला 27 एप्रिलला झाले होते. तसेच फिरोज खान यांचे निधनावेळी 70 वय होते, विनोद खन्नांचेही 70 वय होते. विशेष म्हणजे या दोघांच्या निधनाचे कारणही एकच आहे कर्करोग. 

विनोद खन्ना आणि फिरोज खान यांच्या मैत्रीला सुरवात झाली ती 1976 मध्ये आलेल्या 'शंकर शंभू' या चित्रपटाने. या दोघांनी या चित्रपटात भूमिका केली होती. त्यानंतर फिरोज खान विनोद खन्नांना 1986 मध्ये आलेल्या 'जाँबाज' चित्रपटात प्रमुख भूमिका देण्यासाठी आग्रही होते. पण, विनोद खन्ना धर्मगुरू ओशो रजनीश यांच्या अमेरिकेतील आश्रमात स्थायिक झाले होते.

Web Title: Vinod Khanna And Feroz Khan Died On Same Date, At Same Age And Of Same Disease