भारतात 10 पैकी 4 किशोरवयीन मुलींचा होतो छळ

वृत्तसंस्था
शुक्रवार, 25 नोव्हेंबर 2016

नवी दिल्ली - भारतात एकोणीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर प्रत्येक 10 मुलींपैकी 4 पेक्षा अधिक मुलींना हिंसेला किंवा छळाला सामोरे जावे लागत असल्याची धक्कादायक माहिती एका सर्व्हेक्षणातून समोर आली आहे.

नवी दिल्ली - भारतात एकोणीस वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलींवर प्रत्येक 10 मुलींपैकी 4 पेक्षा अधिक मुलींना हिंसेला किंवा छळाला सामोरे जावे लागत असल्याची धक्कादायक माहिती एका सर्व्हेक्षणातून समोर आली आहे.

आंतरराष्ट्रीय महिला हिंसा निर्मुलन दिवसाच्या पार्श्‍वभूमीवर एक सर्व्हे करण्यात आला. आंतरराष्ट्रीय स्तरावर महिला आणि बालकांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थेने केलेल्या सर्व्हेक्षणातून ही माहिती समोर आली आहे. या सर्व्हेक्षणात ब्राझील, युके, थायलंड आणि भारत या चार देशांतील महिलांचा अभ्यास करण्यात आला. या सर्व्हेचा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. भारतामधील एकूण महिलांच्या तुलनेत 19 वर्षांपेक्षा कमी वयाच्या तब्बल 41 टक्के मुलींचा छळ करण्यात येतो. तर हेच प्रमाण ब्राझीलमध्ये 16 टक्के, युकेमध्ये 12 टक्के तर थायलंडमध्ये केवळ 8 टक्के असल्याचे आढळून आले आहे.

या सर्व्हेक्षणात मागील एक महिन्यात झालेल्या छळाबाबतही महिलांना प्रश्‍न विचारण्यात आले होते. हे प्रमाण ब्राझीलमध्ये सर्वाधिक 87 टक्के, तर भारतामध्ये 73 टक्के असल्याचे दिसून आले आहे. भारतातील 82 टक्के महिला आपल्या छळाचा निषेध करण्यासाठी योग्य ती पावले उचलत असल्याचे सर्व्हेतून स्पष्ट झाले आहे. त्यामध्ये 25 ते 34 वयोगटातील महिलांचे प्रमाण 91 टक्के आहे. महिलांचा छळ करणाऱ्यांविरूद्ध तातडीची कारवाई करण्याची व्यवस्था उभारण्यात यावी अशी अपेक्षा तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.

Web Title: Violence against women