
Violence Erupts in Gujarat During Garba Festival Cars Set on Fire Stone Pelting Reported
Esakal
Garba Event Clash: गुजरातच्या गांधीनगरमध्ये गरब्याच्या कार्यक्रमात झालेल्या वादानंतर मोठा गोंधळ झाला. यानंतर हिंसाचाराची घटना घडलीय. गांधीनगरमधून देहगाम इथं किरकोळ वादातून दोन समाजातील लोक आमने-सामने आले. दोन्ही बाजूने दगडफेक झाली. यात काही समाजकंटकांनी तोडफोड करत जाळपोळही केली. पोलिसांनी शर्थीचे प्रयत्न करत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. पोलीस सीसीटीव्हीच्या माध्यमातून समाजकंटकांचा शोध घेत आहेत.