आसाम-मिझोराम सीमेवर हिंसाचार; अमित शहांकडे हस्तक्षेपाची मागणी

गृहमंत्री अमित शहा यांनी दोन्ही मुख्यमंत्र्यांशी साधला संवाद
Asam-Mizoram border issue
Asam-Mizoram border issueSakal Media
Updated on

नवी दिल्ली : ईशान्येकडील आसाम-मिझोराम राज्यांचा सीमावाद आज जोरकसपणे उफाळून आला. यातून सोमवारी दुपारी इथे दगडफेक झाल्याचं वृत्त आहे. या घटनेवर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मदतीसाठी धाव घेतली. यावर शहा यांनी याप्रकरणी दोन्ही मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आणि इथला सीमावाद सोडवण्याची सूचना केल्या. (Violence on Assam Mizoram border Both CM demanded intervention Amit Shah aau85)

आसाम पोलिसांनी सोमवारी आरोप केला की, "मिझोराममधील काही समाजकंटकांनी सीमेवरील आसाम सरकारच्या सरकारी अधिकाऱ्यांवर दगडफेक करत हल्ला चढवला. लैलापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडला. येथील आसामच्या जमिनीवर मिझोरामकडील नागरिकांकडून होत असलेल्या अतिक्रमणाविरोधात कारवाईसाठी आसाम सरकारचे अधिकारी बॉर्डरवर पोहचले होते." या दगडफेकीच्या घटनेचा व्हिडिओ मिझोरामचे मुख्यमंत्री झोरामथांगा यांनी ट्विटरवर शेअर केला आणि तो गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केला. तसेच शहा यांनी या प्रकरणात लक्ष घालावं अशी विनंती केली.

यानंतर आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सर्मा यांनी देखील या घटनेचा व्हिडिओ ट्विट केला आणि तो पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना टॅग केला यामध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली. दोन्ही मुख्यमंत्र्यांच्या हस्तेक्षापाच्या विनंतीनंतर गृहमंत्री अमित शहा यांनी याप्रकरणी लक्ष घातलं आणि त्यांच्याशी फोनवरुन संवाद साधला.

सुत्रांनी शहा आणि मुख्यमंत्र्यांच्या चर्चेचा तपशील सांगताना सांगितलं की, शहा यांनी आसाम आणि मिझोराम या दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना त्यांचा सीमावाद सोडवण्याच्या सूचना दिल्या. यानंतर दोन्ही मुख्यमंत्र्यांनी यावर तोडगा काढून शांतता राखण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी तयार झाले. यानंतर दोन्ही राज्यांचे पोलीस या वादग्रस्त जागेवरुन परतल्याचे सुत्रांकडून कळते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com