

Vipin Sahu Earns Rs 22 Lakh from meme
Esakal
सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अनेकदा त्यातून काहीजण प्रसिद्धीच्या झोतात येतात. काहींची ही प्रसिद्धी पुढे टिकते तर काहीजण विस्मरणात जातात. मात्र याच प्रसिद्धीतून पैसेही कमावता येतात हे विपिन साहू याने दाखवून दिलं आहे. '१००-२०० रुपये जादा ले, लेकीन लँड करा दे भाई' असं म्हणणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यावरूनच अनेक मीम्स सोशल मीडियावर बनले आणि व्हायरल झाले. याच व्हायरल व्हिडिओच्या मीम राइट्समधून विपिनने तब्बल २२ लाख रुपये कमावले आहेत. याशिवाय यूट्यूबच्या माध्यमातूनही त्याने सुमारे २० लाख रुपयांची कमाई केली आहे.