मोनालिसा अल्पवयीन? व्हायरल गर्लच्या जन्मतारखेवर हायकोर्टाचा मोठा निर्णय

Monalisa Minor Case मध्य प्रदेश हायकोर्टाने मोनालिसा अल्पवयीन असल्याचा नगरपालिकेचा आदेश रद्द केला आहे. इंदौर पीठाने महेश्वरच्या मुख्य नगरपालिका अधिकाऱ्यांनी जारी केलेला आदेश फेटाळून लावला.
Monalisa Minor Case

Monalisa Minor Case

Esakal

Updated on: 

महाकुंभ मेळ्यात चर्चेत आलेली व्हायरल गर्ल मोनालिसा भोसले हिच्या वयाचा वाद थेट उच्च न्यायालयात पोहोचला होता. आता नगर पालिकेनं दिलेल्या आदेशाला हायकोर्टानं रद्द ठरवलं आहे. कोर्टाने म्हटलं की, अधिकारी कोणत्याही व्यक्तीच्या वयाशी संबंधीत इतका मोठा आणि गंभीर निर्णय त्याला न सांगता घेऊ शकत नाहीत. न्यायमूर्ती गजेंद्र सिंह यांनी मोनालिसाच्या वडिलांच्या भूमिकेवरूनही खडसावलं. मोनालिसाने तिच्या मर्जीने लग्न केल्यानंतरच वडिलांना आकाश-पाताळ एक करायला सुरू केलं असं कोर्टाने म्हटलं.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com