True love Story
esakal
Viral Love Video True love Story : खरं प्रेम केवळ शब्दांत व्यक्त होत नाही, तर कठीण प्रसंगी दिलेल्या साथीतून ते दिसून येतं. अशाच प्रेमाचं एक हृदयस्पर्शी उदाहरण सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एका महिलेचा व्हिडिओ समोर आला असून, ती कोणत्याही मदतीशिवाय आपल्या अपंग पतीला ट्रेनमध्ये चढण्यास मदत करताना दिसत आहे. या दृश्याने लाखो लोकांच्या डोळ्यांत पाणी आणलं आहे.