उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग! लग्नाच्या दिवशी वारंवार गेला नवरीच्या खोलीत; संतापलेल्या पित्याने... - Viral News | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Viral News

उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग! लग्नाच्या दिवशी वारंवार गेला नवरीच्या खोलीत; संतापलेल्या पित्याने...

उत्तर प्रदेशमध्ये विचित्र घटना समोर आली आहे. लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. सर्व विधी होत होते. नवरदेव-नवरी लग्नानंतर एकत्र होणार होते. मात्र विधीला ते मान्य नव्हते. एकीकडे लग्नाचे विधी सुरू असताना. नवरदेव चांगलाच उतावळा होत होता.

नवरदेव मुलगा सतत नवरीच्या खोलीत ये-जा करीत होता. उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग, असा काहीसा प्रकार सुरू होता. नवरदेवाला वारंवार नवरीच्या खोलीत जाताना त्याच्या वडिलांनी पाहीले. त्याला असे करण्यापासून रोखले. मात्र नवरदेव काही थांबलाच नाही. यामुळे संतापलेल्या वडिलांनी त्याला चापट मारली. Viral News

नवरदेवाला मारहाण झाल्याची बातमी वधूला मिळताच ती संतापली. संताप इतका वाढला की लग्न मोडले आणि मिरवणूक वधूविना परतली. कानपूरच्या बारा येथून लग्नाची मिरवणूक आली होती. वधूला पाहून नवरदेव तिच्या प्रेमात पडला होता.

मात्र लग्नानंतर नवरी परत तिच्या घरी वापस येईल, असे नवरदेवाला सांगण्यात आले. नवरीने आपल्यासोबत राहावे अशी त्याची इच्छा होती. त्यामुळे तो वारंवार विधीदरम्यान नवरीच्या खोलीत जाऊन तिला सोबत राहण्यासाठी सांगत होता. 

हे पाहून नवरदेवाचे वडील संतापले आणि त्यांनी रागाच्या भरात त्याला मंडपातच चापट मारली. स्वतःच्याच लग्नात मारहाण झालेल्या वराला इतका राग आला की त्याने बदल्यात वडिलांना चापट मारली. या घटनेमुळे संतापलेल्या नवरीने अशा कुटुंबात लग्न करणार नसल्याचे सांगितले. 

नवरी म्हणाली की, नवरदेव सतत तिच्याकडे येत होता. तो एक वर्ष तिला माहेरी पाठवणार नसल्याचे सांगत होता. शिक्षण देखील सासरी पूर्ण करा, अशी त्याची अट होती. त्यामुळे नाराज होऊन लग्न मोडल्याचे नवरीने सांगितले.

घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनीही प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न केला, मात्र काही निष्पन्न झाले नाही. शेवटी वराचे कुटुंब वधूला न घेताच परतले. DNA ने याबाबत वृत्त दिले आहे.

टॅग्स :viral