7 जणांचं कुटुंब निघालं होतं बाईकवरून; पोलिसांनी हातच जोडले

Family-On-Bike
Family-On-Bike

सोशल मीडियावर कधी कोणत्या गोष्टीची चर्चा होईल आणि कधी काय व्हायरल होईल सांगता येत नाही. सध्या अशाच एका फोटोची चर्चा सोशल मीड़ियावर रंगली आहे. एका दुचाकीवर किती लोक बसू शकतात? असा प्रश्न विचारला तर दोन हे नियमात बसणारं उत्तर तुम्ही द्याल. फारतर नियम मोडून तिघे किंवा चौघे बसतील. पण सध्या व्हायरल होणाऱ्या फोटोत तिघे चौघे नाही तर अख्खं कुटुंब एका गाडीवर बसल्याचं दिसत आहे. फोटोमध्ये सात जण गाडीवर बसलेले दिसतील.

व्हायरल होत असलेला फोटो बिहारमधल्या पूर्व चंपारण्यमधील आहे. ढाका या गावात एका कुटुंबातील सात व्यक्ती एकाच दुचाकीवरून जाताना पोलिसांनी पाहिले. एका दुचाकीवर इतक्या लोकांना पाहून पोलिसांनी त्यंना अडवलं आणि इतर काही बोलण्याऐवजी थेट हातच जोडले. एखाद्या कारमध्येही इतके लोक बसतील का अशी शंका येईल. पण एका दुचाकीवर इतक्या लोकांना पाहून पोलिसांच्या या कृतीचा फोटो व्हायरल होत आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दुचाकीवर एक पुरुष , एक महिला आणि पाच लहान मुलं होती. त्यांनी सोबत काही सामानही घेतलं होतं. वाहतुक नियमांचे पालन न केल्यानं पोलिसांनी त्यांना फटकारलंसुद्धा. पण त्याचवेळी हातही जोडले आणि त्याचा फोटो नेमका एका तरुणाने काढला. 

दुचाकीवर कुटुंबाचा हा फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला..पोलिस नेहमी रस्त्यावर नियम मोडणाऱ्यांना चालकांना दंड आकारताना दिसतात पण ह्या फोटोने मात्र त्यांचे  वेगळेच रूप लोकांना बघायला मिळत आहे. ह्या फोटोमुळे  दुचाकीस्वार कशा पद्धतीनं नियमांचे उल्लंघन करतात हे लक्षात येते. सोशल मीडियावर पोलिसाच्या हात जोडण्याचं कौतुक केलं जात असून दुचाकीस्वाराला ट्रोलही केलं जात आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com