कुरकुरे देईनात, आई-बहिणीने बांधून मारलं; चिमुकल्यानं थेट पोलिसांना कॉल केला, पुढे काय घडलं? पाहा VIDEO

VIRAL VIDEO : एका ८ वर्षांच्या मुलाने थेट पोलिसांना कॉल करून आई कुरकुरे घेण्यासाठी पैसे देत नसल्याची तक्रार पोलिसांकडे केली. आई आणि बहीण मला दोरीने बांधून मारत असल्याचंही त्याने सांगितलं.
VIRAL VIDEO

Viral Kurkure Case Boy Complains to Police About Mother and Sister

Esakal

Updated on

Trending News: एका ८ वर्षांच्या मुलाला आईनं कुरकुरे घेऊन द्यायला नकार दिला. आई यासाठी मुलाला ओरडली, यानंतर मुलानं थेट पोलिसांना कॉल करून आईची तक्रार केली. यानंतर पोलिसांनी थेट घर गाठलं आणि मुलाला कुरकुरे खरेदी करून दिले. मुलाला असं ओरडू नका आणि मारहाण करू नका असंही सांगितलं. मध्य प्रदेशातील सिंगरौली इथं ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com