
मध्य प्रदेशातील इंदोरमध्ये काही तरुण-तरुणींमधील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. किशनगंज पोलीस स्टेशन परिसरातील भगवती ढाब्याबाहेर तरुण-तरुणींच्या दोन गटात तुंबळ हाणामारी झाली. त्यापैकी बहुतेक जण मद्यधुंद असल्याचे सांगण्यात येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.